vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त संवाद ग्रंथपालांशी;ग्रंथपाल वाचन संस्कृतीचे खरे संवर्धक-डॉ.सुभाष चव्हाण

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त संवाद ग्रंथपालांशी;ग्रंथपाल वाचन संस्कृतीचे खरे संवर्धक-डॉ.सुभाष चव्हाण

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- ग्रंथपालांनी योग्य वाचकाला योग्य वाचन साहित्य द्यायला हवे. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहीजे. यासाठी ग्रंथपालांनी विशेष प्रयत्न करायला हवे कारण ग्रंथपाल हे वाचन संस्कृतीचे खरे संवर्धक होय, असे प्रतिपादन डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले. शासकीय विभागीय ग्रंथालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिना निमित्त ‘संवाद ग्रंथपालांशी’ या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि.१२) करण्यात आले. शासकीय विभागीय ग्रंथालय, सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व मॉडर्न संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविदयालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

उदघाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे होते. तर मॉडर्न संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नामदेव सानप, विवेकानंद कॉलेजचे ग्रंथपाल डॉ.गोवर्धन औटे, सेवा निवृत सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजशेखर बालेकर,डी. बी. देशपांडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक विष्णु बोडखे,दै. लोकमतच्या वरीष्ठ ग्रंथपाल डॉ रमा देशपांडे, शालेय ग्रंथपाल संघटनेचे बाबासाहेब मुळे,खडकेश्वर वाचनालयाच्या ग्रंथपाल समता लोंढे, शिशु विहार माध्यमिक शाळेच्या ग्रंथपाल स्मिता आगलावे, बलवंत वाचनालयाचे ग्रंथपाल भारत सुरवसे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थ‍ित होते.

याप्रसंगी मोहल्ला लायब्ररीचे संचालक मिर्झा अब्दुल कय्युम नदवी व जीवन विकास ग्रंथालयाचे सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथमित्र लक्ष्मण मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले.सुत्रसंचालन अनिल बाविस्कर यांनी तर आभार प्रदर्शन मारुती फुलारी यांनी केले. कार्यक्रमास ग्रंथपाल, ग्रंथालयीन कार्यकर्ते, वाचक सभासद, विद्यार्थी तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॅलो डायबिटीज आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन..

अग्निशमन सेवा दिनानिमित्त नमुंमपा अग्निशमन दलामार्फत शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय-महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी…

vishwatmaklokswamivarta

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह

ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत 72 हजार घरकुल पूर्ण…

vishwatmaklokswamivarta