vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

१३ तासात ३०० किमी सायकलिंग पूर्ण :कैलास झोळगे ठरले पोडियम फिनिशर्स

१३ तासात ३०० किमी सायकलिंग पूर्ण :कैलास झोळगे ठरले पोडियम फिनिशर्स

जालना (प्रतिनीधी) व्हिएतनाम येथील जागतिक पातळीवर स्पर्धेत जालन्याचे नाव उंचीवर नेऊन ठेवणारे आयर्नमॅन कैलास झोळगे यांनी ३०० किलोमिटर सायकलिंग केवळ १३ तासात पूर्ण करत आणखी एका विक्रमाची नोंद आपल्या नावावर करून जालना जिल्ह्याचे नावलौकिक करत सुपर रेडओनर किताब मिळवला.एस.आर.असलेले आय.पी.एस.संजय बारकुंड यांनीही या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत १४ तास ३० मिनिटात सदर अंतर पूर्ण केले तसेच अनिरुद्ध झुंबड यांनी १८ तास १० मिनिटात अंतर पूर्ण करून सुपर रेडओनर किताब पटकावला आहे.

फ्रान्सच्या ‘ऑडेक्स क्लब पॅरिसियन (ACP) या जागतिक संस्थेच्या मान्यतेने दि.१६ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील फिनिक्स क्लब येथून सकाळी ६ वाजता बी.आर.एम. सायकल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर ते बीड आणि परत छत्रपती संभाजीनगर अशी तब्बल ३०० किलो मिटर जागतिक स्तरावर अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या सायकल स्पर्धेत जालन्याच्या स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली. या यशाबद्दल डॉल्फिन स्पोर्ट्स ग्रुपचे अध्यक्ष नथुमल नाथानी, प्रिन्सिपल काबरा, अर्जुन गेही, रमेश मगरे, तोष्णीवाल, अनिल मालपानी, रमेश तोतला, विठ्ठल गाडेकर, खेरुडकर, कोरके, सिद्धिविनायक झोळगे, प्रणव किनगावकर, स्पोर्ट्स ग्रुप, क्रीडाप्रेमी, सायकल संघटना, मित्र परिवार सर्व अधिकारी आदींनी आयपीएस संजय बारकुंड,आयर्नमॅन कैलास झोळगे आणि अनिरुद्ध जुंबड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चौकट—-हवा,ऊन,पाऊस,मात्र जिद्द कायम,राखत स्पर्धेत मिळवले अव्वलस्थान

—-अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या जालन्याच्या स्पर्धकांनी जिद्दीच्या बळावर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हवामान,खड्डे, पाऊस,ऊन आद्रता,चढ – उताराचा आणि दुसरीकडे वेळेचे कडक बंधन अशा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत जिद्द आणि अफाट सहनशक्तीच्या बळावर सदर ३०० किलोमिटरचे अंतर वेळेच्या आत पूर्ण करून कैलास झोळगे यांनी अव्वल स्थान मिळवत जालन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

 

संबंधित पोस्ट

जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम #‘ई-टपालवाला सेवा’जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांना आता मिळणार जलद माहिती..

विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून  समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल – मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे- विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न…

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी निधीचे योग्य नियोजन करा – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर आरोग्य भवन येथे आढावा बैठक

मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत आहेत. स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन