vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रेखा भगवान शेजुळ यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

रेखा भगवान शेजुळ यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

जालना, (प्रतिनिधी)- शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटी, जालना यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या प्रयाग प्राथमिक विद्यालयातील शिक्षिका रेखा भगवान शेजुळयांना यंदाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.या पुरस्कार सोहळ्यास बदनापूरचे गटशिक्षणाधिकारी गजानन वाळके प्रमुख

अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटीचेअध्यक्ष आनंद वाघमारे, सचिव सुनील भगत, सदस्य सुनील देशमुख, प्राध्यापकपवन देशमुख, क्लबचे पदाधिकारी, जालना शहरातील प्रतिष्ठित मान्यवर आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रेखा

भगवान शेजुळ यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व नारळ प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, विविध शैक्षणिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग आणिविद्यार्थ्यांच्या जडणघडणीत दिलेले योगदान यांची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.प्रयाग प्राथमिक विद्यालयाचे पदाधिकारी दिनेश भुतेकर, मुख्याध्यापिका

सविता भुतेकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद यांनी रेखा शेजुळ यांचेअभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेचबाळासाहेब कावळे व साहिल शेजुळ यांनीही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

०००००००

फोटो अ‍ोळी…..७-शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटी, जालनायांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते रेखा भगवान शेजुळ यांना सन्मानपत्र,शाल, श्रीफळ व नारळ प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.

००००००

संबंधित पोस्ट

अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन

फॅन्ट्सी किड्स स्कूलमध्ये शाळेचे हस्तकला प्रदर्शन : पालकांनी दिली दाद…

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बालनिरीक्षणगृहांना भेट

vishwatmaklokswamivarta

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारीजिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!२२ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत राज्यात विविध उपक्रम साजरे होणार – पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे