vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

पहिल्या प्रकाश पर्वानिमित्त महाआरोग्य शिबिर; १ हजार १५७ नागरिकांना मोफत आरोग्यसेवा

पहिल्या प्रकाश पर्वानिमित्त महाआरोग्य शिबिर; १ हजार १५७ नागरिकांना मोफत आरोग्यसेवा

 

नांदेड प्रतिनिधी : श्री गुरुग्रंथ साहिबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड आणि गुरु रामदास सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुद्वारा गेट क्रमांक १ येथे महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १ हजार १५७ नागरिकांना विविध मोफत वैद्यकीय सेवांचा लाभ देण्यात आला.

शिबिरात मेडिसिन, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, ईएनटी, स्त्रीरोग, बालरोग, दंतचिकित्सा, नेत्ररोग, त्वचारोग, आयुर्वेद व फिजिओथेरपी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून उपचार व मार्गदर्शन केले. तसेच रक्तदानाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

विभागनिहाय मेडिसिन २२०, शल्यचिकित्सा २५, अस्थिरोग ६१, ईएनटी ४४, स्त्रीरोग २२, बालरोग ११, दंतचिकित्सा १७१, नेत्ररोग २८०, त्वचारोग ७८, आयुर्वेद ११०, फिजिओथेरपी १२३ आणि रक्तदान १२ अशा सेवांचा नागरिकांनी लाभ घेतला.

याशिवाय १२७ आयुष्मान भारत (ABHA) कार्ड, ८ ईसीजी आणि ३१५ रक्त तपासण्या करण्यात आल्या. पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या ४३ रुग्णांना उच्चस्तरीय रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.शिबिराच्या आयोजनात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, श्री गुरु गोविंद सिंहजी स्मारक जिल्हा सामान्य रुग्णालय, नांदेड रुरल डेंटल कॉलेज, नांदेड फिजिओथेरपी कॉलेज अँड रिसर्च सेंटर, लॉयन्स हॉस्पिटल (जंगमवाडी), आरोग्य भारती नांदेड आणि धन्वंतरी सेवाभावी संस्था, लोहा यांनी सहभाग घेतला.

शिबिरास राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे, विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, डॉ. सचिन पाटील उमरेकर, डॉ. पुष्कर महाजन व डॉ. निलेश पाटील यांची उपस्थिती होती.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे, समन्वयक संभाजी लोंढे तसेच श्री गुरु रामदास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष स. गुरुदीपसिंग संधू यांनी सहकार्य केले.मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

**********

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना उद्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील ढासाळवाडी गावासाठी टँकर मंजूर

vishwatmaklokswamivarta

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल – मुख्यमंत्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

एक ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह  –जिल्हाधिकारी किशन जावळे

बालकामगार आढळल्यास थेट परवाना रद्द करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

vishwatmaklokswamivarta

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*