vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी नगरीत 99 श्री आरती संग्रहाचे पुस्तकाचे वाटप करून श्री गणरायाचे धुमधडाक्यात स्वागत

धारावी नगरीत 99 श्री आरती संग्रहाचे पुस्तकाचे वाटप करून श्री गणरायाचे धुमधडाक्यात स्वागत

मुंबई प्रतिनिधी- देशासह राज्यभरात गणपती बाप्पाच्या आगमनाच्या उत्सवाची धूम सुरू आहे त्यातच लहान गणपती मोठे गणपती मानाचे गणपती घरगुती गणपती यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे आज महागणपती सोहळ्याचे सामाजिक संस्थांनी स्वागत केले आहे त्यात धारावी विभागातील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गणपती मंडळांना आणि छोट्या छोट्या गणपती धारकांना आरती संग्रह मोफत देण्यात आले

आज 14 सप्टेंबर 2026 पासून श्री उत्सवास सुरुवात झाली घरोघरी येणारे गणपती व कुटुंबीय तसेच गल्लीबोळातील लहान लहान मंडळे यांना एक संघात एक सुरात आरती म्हणता यावी एकत्र आरतीचा आनंद लुटता यावा याकरिता साप्ताहिक भगवे वादळ संचालित श्री आरती आरती संग्रहाचे कुटुंबप्रमुख व मंडळाचे प्रमुख यांना 99 पुस्तकाचे वाटप धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन व धारावी नागरिक समिती यांच्या माध्यमातून संपादक दत्ता खंदारे यांच्या प्रेरणेतून प्रकाशित झालेल्या आरती संग्रहाचे वाटप सकाळी साडे दहा ते साडेबारा या वेळात संत कक्कया मार्ग धारावी येथे करण्यात आले प्रमुख मार्गदर्शक दिलीप गाडेकर यांच्या उपस्थितीत व बीट प्रमुख अलका साबळे यांच्यासह सविता शेरखाने दामोदर शिंदे गिरीराज शेरखाने शंकर खिल्लारे व कवयित्री विमल बबन गजरे यांच्या उपस्थितीत 99 पुस्तक संग्रहाचे वाटप करून कुटुंबासह घरगुती गणपती व गल्लीबोळातील सार्वजनिक गणपती यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन श्री सोबत पुस्तक भेट व छायाचित्र काढण्यात आले यावेळी संपादक दत्ता खंदारे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले या श्री आरती संग्रह मुळे एकत्र आरती एक समूहात एक सुरात घेतली जाईल असा आशावाद मार्गदर्शक श्री दिलीप गाडेकर यांनी व्यक्त करून श्रीगणेशाला आम्हा धारावीकरांना चांगले घर व मोफत घर मिळो असे साकडे श्री गणेशाला सामूहिक रित्या देवाकडे प्रार्थना करून साकडे घातले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी संपूर्ण देशवासीयांना गणपती उत्सवाच्या शुभेच्छा दिलेले आहेत

संबंधित पोस्ट

कोरेगाव येथे 6 मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

रेशिम विभाग आपल्या दारी’ मोहिम

vishwatmaklokswamivarta

विशेष भारत निवडणूक आयोगातर्फे झारखंडमधील ‘बीएलओ’ पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026बदलापूर क्रीडामय, राज्‍य व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन,बदलापूरमध्ये इनडोअर स्‍टेडियम उभे करणार -आमदार किसन कथोरे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024ची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध-

मुंबईकरांसाठी मोठी बातमी: रेल्वेने विनातिकीट प्रवास केल्यास आता दुप्पट दंड! लवकरच अधिसूचना होणार जाहीर