vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी:- केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत प्रति थेंब अधिक पिकअंतर्गत यंदाचे वर्ष २०२६-२७ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांसाठी सूक्ष्म सिंचनाचा अनुदानाचा निधी मंजूर आहे. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावर भेट देऊन १५ ऑक्टोबर २०२६ पूर्वी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना सर्व माहिती अचूक भरणे अपेक्षित आहे. ज्याद्वारे अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. योजनेचा लाभ एका शेतकऱ्याला कमाल पाच हेक्टर क्षेत्र मर्यादत दिला जातो. शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावेत. अर्जासाठी https:///mahadbt.maharashtra.gov.in/farmer/agrilogin या संकेतस्थळावर भेट दयावी. या पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करताना शेतकऱ्यांकडे अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी हा ओळख पडताळणीसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील आपले सरकार सेवा केंद्र, कृषी विभागाचे अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती फरांदे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

मदरशांचे ५० लाखांचे अनुदान थांबवून त्यांचे सामान्य शाळांत रूपांतर करा!- हिंदु जनजागृती समितीची राज्यशासनाकडे मागणी,उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर मदरशांचे सर्वेक्षण करा; अन्यथा राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा 

जाफराबाद, भोकरदन, घनसावंगी -अंबड, बदनापूर, जालना येथील आंदोलन-एसटीच्या तिकीट दर वाढीच्या निषेधार्थ जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीनेचक्काजाम व निदर्शने…

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ ! राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात २० गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट कामांना मंजुरी१०५.३१ लाख रुपयांच्या १२७ उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता..

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी पुढाकार घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शारीरिक क्षमता निर्माण करावी- राज्यपाल हरिभाऊ बागडे* ▪️शिरूर अनंतपाळ येथे प्रभाकर कुलकर्णी गुरुजी यांचा जीवनगौरव सोहळा  ▪️’असा एक प्रभाकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta