vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ आरोग्य शिबिरे, रक्तदान आणि वृक्षारोपणातून जपली सामाजिक बांधिलकी

मुंबईत ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ-आरोग्य शिबिरे, रक्तदान आणि वृक्षारोपणातून जपली सामाजिक बांधिलकी..

मुंबई, प्रतिनिधी नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या सूचनेनुसार ‘सेवा संकल्प अभियाना’ला सुरुवात झाली. या अभियानांतर्गत विविध वॉर्डांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवून लोकसहभाग आणि निस्वार्थ जनसेवेचा नवा आदर्श प्रस्थापित करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आह‘डी’ वॉर्डमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर

नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत, ‘डी’ वॉर्ड कार्यालयात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जसलोक रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांची रक्तदाब, रक्तातील साखर, आरोग्य तपासणी करण्यात आली. परिसरातील एकूण ४५ नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.ई’ वॉर्डमध्ये महारक्तदान शिबि

सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा आरोग्य विभागाच्या वतीने ‘ई’ वॉर्ड मधील घोडपदेव येथे ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ महारक्तदान शिबिराने झाला. घोडपदेव सार्वजनिक मंडळ आणि नायर रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरातून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्यात आली. या रक्तदान शिबिरातून अभियानातील सार्वजनिक आरोग्य उपक्रमांची सुरुवात झाली असून, यातून नागरिकांमध्ये लोकसहभागाचा सकारात्मक संदेश पोहोचविण्यात आला आहे.

‘ए’ वॉर्डमध्ये वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनमनपा उद्यान विभाग, ‘ए’ वॉर्डच्या वतीने फोर्ट परिसरातील शहीद भगतसिंग मार्गावर राजपुष्प असलेल्या ‘ताम्हण’च्या दोन वृक्षांचे रोपण करण्यात आले. ‘ए’ वॉर्डचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करून ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला.

प्रशासनाने लोकाभिमुख उपक्रमांमधून केवळ नागरिकांच्या आरोग्याचीच काळजी घेतली नाही, तर हरित आणि निरोगी परिसराचा संकल्पही अधिक दृढ केला आहे.

000

संबंधित पोस्ट

मंत्रालयात पत्रकारांना मज्जाव – ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून तीव्र निषेध! पत्रकारांना थांबवणं म्हणजे लोकशाहीला गप्प करणं – संदीप काळे 

vishwatmaklokswamivarta

आनंददायी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त 20 कर्मचाऱ्यांचा सन्मान..

vishwatmaklokswamivarta

प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न अन्नकूट प्रसाद ही केवळ परंपरा नाही, ती भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे ही परंपरा पुढील पिढ्यांनी जपली जावी – जिल्हाध्यक्ष, भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे अडकलेल्या राज्यातील प्रवाशांचा पुढील प्रवास सुखरूपणे सुरू – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

महाराष्ट्रातील जीएसटी महसुलात १२.६ टक्क्यांची वाढ; राज्याच्या कर महसुलात विभागाचा दोन-तृतीयांश वाटा

वारणा धरणात 29.09 टी.एम.सी. पाणीसाठा