vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अर्धन्यायिक प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी मिरज तालुक्यातमहात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान- तहसिल कायर्यालय मिरज येथील सभागृहात 24 सप्टेंबर रोजी तर सर्व मंडळ अधिकारी यांच्या   कार्यालयात 21 सप्टेंबर 2026 रोजी लोकअदालतीचे आयोजन

अर्धन्यायिक प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी मिरज तालुक्यातमहात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान- तहसिल कायर्यालय मिरज येथील सभागृहात 24 सप्टेंबर रोजी तर सर्व मंडळ अधिकारी यांच्या   कार्यालयात 21 सप्टेंबर 2026 रोजी लोकअदालतीचे आयोजन

 

सांगली, प्रतिनिधी): तहसिल कार्यालय मिरज व क्षेत्रीय स्तरावरील मंडळ अधिकारी कार्यालय येथे अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान आयोजित करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कायर्यालय मिरज येथील सभागृहात तसेच क्षेत्रीय स्तरावर तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात सोमवार दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे- धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकाटी व जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक (Quasi-Judicial) न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित महसुली दावे मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. विविध कारणांमुळे हे दावे प्रलंबित राहिल्याने पक्षकारांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. तसेच, एका स्तरावर निकाल लागल्यानंतर असंतुष्ट पक्षकार वरिष्ठ न्यायालयात पुन्हा अपील अथवा पुनरीक्षण अर्ज दाखल करतात, ज्यामुळे हे दावे वर्षांनुवर्षे सुरू राहतात. विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणाऱ्या लोक अदालत धर्तीवर दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने हे महसुली दावे कायमस्वरुपी निकाली काढल्यास अर्धन्यायिक यंत्रणेवरील ताण कमी होऊन पक्षकाराची वेळेची व पैशांची बचत होईल.

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय आणि हक्क पोहोचवणे हे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचे मूळ सूत्र होते. शेतकऱ्यासाठी त्यांनी केलेले काम अमिट आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून, राज्यात महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे जलद गतीने व तडजोडीने निपटारा करण्यासाठी “महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान” आयोजित करण्याबाबत महसूल व वन विभागाकडील शासन निर्णयान्वये निर्देश देण्यात आले आहेत.

त्याअनुषंगाने तहसीलदार मिरज आणि मिरज तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी यांचे न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांचा समावेश करण्यात येणार आहे. महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांमधील पक्षकारांनी आणि त्यांच्या विधिज्ञ यांनी तालुक्यामध्ये आयोजित लोकअदालतीमध्ये सहभाग नोंदवून दाखल अर्धन्यायिक प्रकरणात तडजोडीने आपसातील वाद मिटवून जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

तहसीलदार मिरज यांच्याकडील सुरु असलेल्या शेतरस्ता प्रकरणे, 7/12 दुरुस्तीची प्रकरणे, वाटप दरखास्त प्रकरणे, फेरचौकशी प्रकरणे तसेच मंडळ अधिकारी यांच्याकडे तक्रार केसेस या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. ज्यांना यामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी आपला आपसी तडजोडनामा सादर करावा. ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीशी संबंधित रस्ता, दुरुस्ती, अपिलांची प्रकरणे सुरु आहेत. त्यांनी ती समोपचाराने आपसात समझोता करुन सोडवावीत व आपला वाद मिटवावा, असे आवाहनही तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती करणारा बीड जिल्हा राज्यात प्रथम!महाराष्ट्राला घरकुलांचे अधिकचे उद्दीष्ट मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta

दक्षिण भारतात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज

देवाभाऊ मराठवाडा महाराष्ट्रात आहे का?” डॉ. संजय लाखेपाटील

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)*मंत्रिमंडळ निर्णय …

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी  शेतकऱ्यांच्या वेदना जाणून पारदर्शकपणे गतीने काम करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप, प्रिंटर्सचे वितरण

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा…