vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मौजे केंबुर्ली येथे एकूण 1 हजार 480 बॉक्स अवैधरित्या विदेशी मद्यसाठा जप्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मौजे केंबुर्ली येथे एकूण 1 हजार 480 बॉक्स अवैधरित्या विदेशी मद्यसाठा जप्त

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- दि.21 सप्टेंबर 2026 रोजी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रायगड यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मौजे केंबुर्ली, ता.महाड, येथील हॉटेल निसर्गसमोर सापळा रचून टाटा कंपनीचा बाराचाकी ट्रक क्र. RJ-१९-GE-४११५ अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान या वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला गोवा राज्य बनावटीचा Royal Blue Malt Whisky या विदेशी मद्याचा 180 मिली क्षमतेच्या सीलबंद बाटल्यांचे एकूण 1 हजार 480 बॉक्स अवैधरित्या मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती अधीक्षक, उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

या कारवाईत रु.1,49,18,400/- किमतीचा विदेशी मद्यसाठा, रु.10,00,000/-किमतीचा बाराचाकी ट्रक व रु.8,000/- किमतीचा मोबाईल फोन, असा एकूण रु.1,59,26,400/-किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालक प्रभुलाल भंवरलाल साळवी, वय 35 वर्षे, रा. भिलवाडा, राजस्थान यास अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, महाड विभाग येथे गु.र.क्र. 169/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 चे कलम 65(अ) (ई), 81, 83, 90 व 103 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई डॉ. राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, प्रसाद सुर्वे, सह आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई (अ. व द.) वप्रदीप पवार, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभाग यांच्या निर्देशानुसार तसेच अधीक्षक आदित्य पवार व उपअधीक्षक संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय भोसले, दुय्यम निरीक्षक श्री. पिसाळ, जवान मनोज गायकवाड, निमिष नाईक, श्री.पोटे व महिला जवान श्रीमती रचना मोहिते यांनी पार पाडली असून, पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. पिसाळ करीत आहेत.

रायगड जिल्ह्यात गोवा राज्य बनावटीचे अथवा अन्य परराज्यातील अवैध मद्य, बनावट मद्य, कर चुकवून विक्री होत असलेले मद्य तसेच हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक अथवा विक्री होत असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्र. 1800-233-9999 अथवा व्हॉट्सअॅप क्र.8422001133 वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

000000000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी व उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यातील फेरफार निकाली काढण्यासाठी2 फेब्रुवारीला फेरफार अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

17 नोव्हेंबरला महिला लोकशाही दिनाचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत  जबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी            – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष – सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा 

नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य- अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार· “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” शुभारंभ· सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद महानगरपालिका , स्वयंसेवक आणि गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचे केले अभिनंदन; ‘मियावाकी’ पद्धतीने अवघ्या एका तासात 3.61 लाखांहून अधिक रोपट्यांची लागवड करत रचला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’