vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामीण भागातील समीना सय्यदची गगनभरारी; जिल्हा परिषद नाशिक येथे शिक्षिका म्हणून निवड.

ग्रामीण भागातील समीना सय्यदची गगनभरारी; जिल्हा परिषद नाशिक येथे शिक्षिका म्हणून निवड.

श्री क्षेत्र राजुर (प्रतिनिधी)जिद्द, चिकाटी आणि अखंड सातत्याच्या जोरावर ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने यशाचे शिखर गाठले आहे. चांदई ठोंबरी येथील जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थिनी समीना सय्यद हिची नाशिक जिल्हा परिषदेत पदवीधर प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. गेल्या पंधरा वर्षांच्या अथक संघर्षानंतर मिळालेल्या या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“१५ वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष आणि जिद्द”आजच्या अत्यंत स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणे हे मोठे आव्हान बनले आहे. समीना सय्यद हिने गेल्या १५ वर्षांपासून हार न मानता सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आणि विविध टप्प्यांवरील पेपर दिले. अनेक संकटे आणि आव्हानांचा सामना करत तिने आपला अभ्यासाचा सराव आणि प्रयत्न चालूच ठेवले. अखेर तिच्या या १५ वर्षांच्या तपाचे चीज झाले असून तिने आपल्या ध्येयाला गवसणी घातली आहे.

“शिक्षण हेच जीवन बदलणारे माध्यम”एका अत्यंत सर्वसामान्य मुस्लिम कुटुंब पार्श्वभूमीतून आलेल्या समीनाने आपल्या यशामधून हे सिद्ध करून दाखवले आहे की, परिस्थिती कशीही असली तरी शिक्षण हेच माणसाचे जीवन बदलून टाकणारे सर्वात मोठे माध्यम आहे. तिची ही गगनभरारी ग्रामीण भागातील इतर मुलींसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

कुटुंबाचे आणि काकांचे मोलाचे प्रोत्साहन समीनाच्या या यशामध्ये तिच्या कुटुंबाचा आणि शिक्षक मार्गदर्शकांचा मोठा वाटा राहिला आहे. तिचे वडील शफीक सय्यद आणि काका तथा सामाजिक कार्यकर्ते बिस्मिल्ला सय्यद यांनी समीनाला कठीण काळात सतत प्रोत्साहन दिले आणि तिच्या शिक्षणाचा व ध्येयाचा मार्ग सुकर केला. समीना सय्यद हिच्या या उल्लेखनीय यशामुळे चांदई ठोंबरी गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून तिचे कौतुक व भावी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

0000

संबंधित पोस्ट

लोंबकळणाऱ्या तारा, उघडे डी.पी. याबाबत महावितरणने,जिल्ह्यात सर्वत्र सर्वेक्षण करुन योग्य ती कार्यवाही करावी अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची खांद्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर भेट

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्न व्यवसाय चालकांसाठी अन्न सुरक्षा मार्गदर्शक सूचना;सूचनांचे काटेकोर पालन करा-अन्न सुरक्षा विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जेष्ठ साहित्यिक कलाकार यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर,निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज- अपर जिल्हाधिकारी अडकुणे

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘सनबर्न’ संस्कृतीला लगाम लावून तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवा!