vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चार नवीन कामगार संहितांबाबत ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम३० सप्टेंबर रोजी वाळूज येथे आयोजन; संबंधित घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन

चार नवीन कामगार संहितांबाबत ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम३० सप्टेंबर रोजी वाळूज येथे आयोजन; संबंधित घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली नवीन चार कामगार संहितांबाबत जनजागृती, प्रबोधन व क्षमता बांधणीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत विशेष जनजागृती व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कामगार उपआयुक्त नि. पां. पाटणकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन, कामगार विभाग व संबंधित विभागांच्या समन्वयाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. नवीन कामगार संहितांमधील तरतुदी व त्यांची अंमलबजावणी, नियोक्ते व कामगारांची भूमिका व जबाबदाऱ्या, अनुपालन प्रक्रिया तसेच रोजगार व सामाजिक सुरक्षा योजनांबाबत संबंधित घटकांना माहिती व मार्गदर्शन देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

कार्यक्रमात वेतन संहिता, २०१९; औद्योगिक संबंध संहिता, २०२०; व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या परिस्थितीची संहिता, २०२० आणि सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नियोक्ते व कामगारांच्या शंका व अडचणींचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

केंद्र शासनाच्या व्यापक जनजागृती उपक्रमांतर्गत चार नवीन कामगार संहितांसह PM-VBRY आणि PM-SYM या रोजगार व सामाजिक सुरक्षा योजनांबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत MASSIA, अनिल विश्वासराव चव्हाण सभागृह, पी-१५, मोरे चौक, एमआयडीसी वाळूज, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील संबंधित शासकीय यंत्रणा, उद्योग व औद्योगिक संघटना, कामगार कायदे तज्ज्ञ, एचआर फोरम्स, नियोक्ता प्रतिनिधी, वित्त क्षेत्रातील व्यावसायिक, सनदी लेखापाल, जिल्हा उद्योग केंद्र तसेच अन्य संबंधित घटकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कामगार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

सहकार संकुलनाचे पालक मंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन  

आंतरराष्ट्रीय टायगर दिन निमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं काही दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांची घोषणा केली.वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; त्याच्या ताकदीच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

vishwatmaklokswamivarta

एकत्रित आयुष्मान भारत–महात्मा फुले जनआरोग्य योजना उपचारांची संख्या वाढली; योजना अधिक व्यापक…

vishwatmaklokswamivarta

विषमता मिटवून दलित सवर्णांना जोडण्याचे* *डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा*

नाशिकला अर्थ व सांख्यिकी आयुक्तलयातर्फे 26 पासून प्रशिक्षण कार्यक्रम*

पडताळणीअंती नवी मुंबईत आढळले 13336 दुबार मतदार-दोनपैकी कोणत्या एका ठिकाणी मतदान करणार भरुन घेतले हमीपत्र

vishwatmaklokswamivarta