vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सेवा संकल्प अभियानातून खेर्डा येथे आरोग्य, स्वच्छता व शैक्षणिक उपक्रमांना चालना;गटविकास अधिकाऱ्यांची आरोग्य शिबिरासह विविध ठिकाणी भेट; स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा सहभाग

सेवा संकल्प अभियानातून खेर्डा येथे आरोग्य, स्वच्छता व शैक्षणिक उपक्रमांना चालना;गटविकास अधिकाऱ्यांची आरोग्य शिबिरासह विविध ठिकाणी भेट; स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा सहभाग

बुलढाणा, प्रतिनिधी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील संवैधानिक पदावरील कार्यकाळाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्तरावर सेवा, स्वच्छता आणि जनजागृतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

सेवा संकल्प अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्राम खेर्डा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांनी गावातील आरोग्य शिबिरास भेट देऊन नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय तसेच गणराज अभ्यासिकेलाही भेट देऊन विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

 

अभियानाच्या अनुषंगाने ग्राम खेर्डा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनी या मोहिमेत सहभाग घेत स्वच्छतेबाबत जनजागृती केली. अभियानांतर्गत उल्लेखनीय सहभाग व उपक्रमांची दखल घेत संबंधितांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

 

यावेळी विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. राजपूत, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. पांडे, समुदाय आरोग्य अधिकारी श्री. राठोड, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, ग्राम आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्तरावर आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि नागरिकाभिमुख सेवांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

एचआयव्ही जनजागृती रॅलीमध्ये अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta

टीबी मुक्त ग्रामपंचायतींना 28 कास्य, 136 रोप्य मानांकनाने सन्मानित  टीबी मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहा- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे..

नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या उपस्थितीत आरंभ,गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही लस सर्व नमुंमपा रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध

अहिल्यानगर येथे ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी ९८१ पदनिर्मितीस राज्य शासनाची मान्यता.ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणारआरोग्यसेवेचा आणि त्या अनुषंगाने स्थानिक रोजगार संधीचा विस्तार…सभापती प्रा राम शिंदे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी…

vishwatmaklokswamivarta

बदलापूर उपजिल्हा रुग्णालयात 20 मार्च रोजी-मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी आयुष्मान व वयो वंदना कार्ड आवश्यक