vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

भरती परीक्षा सुधारणांवर उच्चस्तरीय समितीशी संवाद विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांनी उपस्थित राहावे – विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*

भरती परीक्षा सुधारणांवर उच्चस्तरीय समितीशी संवाद विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांनी उपस्थित राहावे – विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*

नवी मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी गठित राज्य भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समिती कोकण विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि संबंधित घटकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहे. मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चेतना कॉलेज, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाजवळ, चेतना महाविद्यालय मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१ येथे हा संवाद आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि उमेदवारांच्या अनुभवांवर आधारित करण्याच्या दृष्टीने या सल्लामसलतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, शैक्षणिक संस्था, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित यंत्रणा, विषयतज्ज्ञ तसेच अन्य संबंधित घटकांना भरती परीक्षा प्रक्रियेतील आपले अनुभव, अडचणी, अपेक्षा आणि सुधारणा संबंधी सूचना प्रत्यक्ष समितीसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

भरती परीक्षांशी संबंधित प्रत्यक्ष अनुभव असलेल्या विद्यार्थी, उमेदवार तसेच संबंधित घटकांचा सहभाग या संवाद प्रक्रियेस महत्त्वाचा असल्याने, ज्यांना परीक्षा पद्धतीबाबत आपल्या सूचना व अनुभव मांडायचे आहेत त्यांनी या संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती अग्रवाल यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हा नियोजन समितीची

वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या देशभरातील अनेक टोळ्या डीआरआयने आणल्या उघडकीस देशभरात संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये 440 हून अधिक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले किंवा संरक्षित वन्यजीव तसेच सुमारे 15 किलो हस्तिदंती वस्तू आणि हस्तिदंत जप्त; 33 जणांना अटक

vishwatmaklokswamivarta

एन.डी.ए.,सी.डी.एस.परीक्षा 13 एप्रिल रोजी4447 उमेदवारांची बैठक व्यवस्था..

शासकीय संस्थेची नूतन इमारत म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये पर‍िवर्तन घडवणारी वास्तू – पालकमंत्री नितेश राणे शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे उद्घाटन

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

मुंबई ते गोवा रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) बोट सेवा सुरु करण्याची योजना आखत आहे. खुद्य मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली.