vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भूमिहीन दलित-आदिवासींना कास्तपट्टे व ७/१२ मिळण्यासाठी२८ सप्टेंबरला जनआक्रोश आंदोलन- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मगरे यांची माहिती

भूमिहीन दलित-आदिवासींना कास्तपट्टे व ७/१२ मिळण्यासाठी२८ सप्टेंबरला जनआक्रोश आंदोलन- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मगरे यांची माहिती

जालना, द (प्रतिनिधी) -दलित-आदिवासी भूमिहीनांना कास्तपट्टे त्यांच्या नावे करून ७/१२ उतारे देण्यात यावेत, तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने सोमवारी २८सप्टेंबर जालनायेथे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना दलित

आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी दिली आहे.शिवसेना दलित आघाडीचे जालना जिल्हाप्रमुख तथा दलित-आदिवासी नेते अ‍ॅड.भास्कर मगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. अंबड चौफुली तेजिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरआंदोलन करण्यात येणार असून, सकाळी ११.३० वाजता आंदोलनाला सुरुवात होणारअसल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे. मराठवाड्यासह विशेषतः जालनाजिल्ह्यातील दलित व आदिवासी भूमिहीनांना कास्तपट्टे त्यांच्या नावे करूनत्यांचे ७/१२ उतारे देण्यात यावेत, ही प्रमुख मागणी आहे. यासाठी शासनाच्या २८ नोव्हेंबर १९९१ च्या निर्णयानुसार, तसेच सर्वोच्चन्यायालयाच्या २८ जानेवारी २०११ रोजीच्या आदेशानुसार आणि १२ जुलै २०११च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांन केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदनदेण्यात आले असून, ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सीएमओ कक्षामार्फत सादरकरण्यात आले आहे. भूमिहीन दलित-आदिवासींच्या जमिनीच्या प्रश्नावर शासनानेbतातडीने निर्णय घेऊन पात्र लाभार्थ्यांना कास्तपट्टे व ७/१२ उतारे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात विविध सामाजिक घटकांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरआंदोलने होत आहेत.

0000

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या – ऍड. सुभाष राऊत-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू   – उपमुख्यमंत्री अजित पवार- विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश- प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करावे- डीपीसीचा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन..

खोटे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे पदोन्नती घेतलेल्या अधिकारी विरुद्ध गुन्हे दाखल करून बडतर्फ करा-भारतीय मानवाधिकार संघटन ची मागणी

महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश!**बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ?* – रमेश शिंदे

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम-एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल नवीन 150 सीएनजी बसेसचे लोकार्पण…

मुंबईतील बांद्रा पूर्व येथे  भारतनगर झोपडपट्टी भागात सिलेंडर स्फोट झाल्याने एका चाळीचा भाग कोसळल्याची घटना..