vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

करिअर समुपदेशन सत्रातून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींची ओळख

करिअर समुपदेशन सत्रातून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींची ओळख

 सांगली, द प्रतिनिधी) : भविष्यातील करिअरची दिशा योग्य वेळी निश्चित करण्याच्या दृष्टीने तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील श्री लक्ष्य अकॅडमी सैनिक पॅटर्न स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मणेराजुरी, येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर समुपदेशन व मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित या सत्रामध्ये श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे यंग प्रोफेशनल प्रविण बनकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत शिक्षणानंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या वाटा, कौशल्याधारित क्षेत्रांतील संधी आणि रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाबाबत माहिती दिली.

 विशेषतः केवळ पारंपरिक शैक्षणिक पर्यायांपुरते मर्यादित न राहता कौशल्य, व्यक्तिमत्त्व, आवड आणि क्षमतेनुसार करिअरची निवड कशी करावी, यावर विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यात आले. विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्ये व पूर्वतयारी याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी करिअर निवड, रोजगाराच्या संधी आणि पुढील शिक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यातील करिअरचे नियोजन करण्यासाठी आवश्यक दिशा व प्राथमिक माहिती मिळाली. यावेळी अकॅडमी चे अध्यक्ष श्री. गुरव व अन्य मान्यवर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया उद्योगांना मोठे अनुदान10 टन क्षमतेचे तेल काढणी युनिट, मिनी ऑईल मिल, 250 मे. टन गोदाम व कडधान्य प्रक्रिया-पॅकेजिंग युनिटसाठी अर्जाची मागणी,राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

उच्चशिक्षित तरुणी कुक्कुटपालनातून बनली यशस्वी उद्योजिका…• जालन्याच्या अंकिता मोरे यांचा झेंडा; 10 महिन्यात 26 लाखांची उलाढाल

रेशीम, रेशीम उत्पादन, हातमाग आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन संधी खुल्या करण्यासाठी भारतीय प्रतिनिधिमंडळाची व्हिएतनामला भेट

vishwatmaklokswamivarta

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन ;पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

रोजगार मेळाव्यात 110 तरुणांना मिळाली नोकरी;  धूत ट्रान्समिशनकडून 27 जणांना जागीच नियुक्तीपत्रे