vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषदेत 14 ऑक्टोबरला पेन्शन अदालत

जिल्हा परिषदेत 14 ऑक्टोबरला पेन्शन अदालत

     जालना, प्रतिनिधी : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी बुधवार, दि. 14 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हा परिषद जालना येथे पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जिल्हा परिषद जालना यांच्या दालनात ही पेन्शन अदालत होणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील उपआयुक्त (आस्थापना) यांच्या दि. 24 जुलै 2019 रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ही पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

पेन्शन अदालतीचे विभागनिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, सकाळी 11 ते 11.30 या वेळेत शिक्षण (प्राथमिक), कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण विभागांशी संबंधित प्रकरणे हाताळण्यात येतील. सकाळी 11.30 ते दुपारी 12 या वेळेत सामान्य प्रशासन, वित्त, पंचायत व सिंचन विभागांच्या तक्रारींची सुनावणी होईल. तर दुपारी 12 ते 12.30 या वेळेत ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, पशुसंवर्धन व समाजकल्याण विभागांशी संबंधित प्रकरणे विचारात घेतली जातील. पेन्शनविषयक प्रकरणे प्रलंबित असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निर्धारित मुदतीत आपले अर्ज सादर करून या पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

****

संबंधित पोस्ट

ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी आगाऊ बुकींग करू नयेजिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन*घरपोच सेवा देण्यासाठी यंत्रणा राबविणार

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

सत्ता आमची लालसा नसून समाज संघटन आमचे उद्दिष्ट आहे – आ.संजय केनेकर

बसमध्ये मिळणार विमानातील सुविधा पाच तरूणांनी एकत्रित येत घडविली ट्रॅव्हल्स क्षेत्रात क्रांती

vishwatmaklokswamivarta