vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी ठाण्यात गोपीकृष्ण संगीत महोत्सव 

३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी ठाण्यात गोपीकृष्ण संगीत महोत्सव

ठाणे प्रतिनिधी – श्री गणेश कल्चरल अकॅडमी, ठाणे यांच्या वतीने प्रख्यात कथ्थक गुरू महामहोपाध्याय डॉ. सौ. मंजिरी श्रीराम देव यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ ३२व्या ‘गोपीकृष्ण संगीत महोत्सवा’चे आयोजन शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर आणि रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले आहे.

 

प्रख्यात नर्तक आणि कथ्थक गुरू पं. गोपीकृष्ण यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव भारतीय शास्त्रीय संगीत आणि कथ्थक नृत्याची समृद्ध परंपरा जपणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम आहे. यंदाच्या महोत्सवात नामवंत कलाकारांच्या सादरीकरणातून संगीत आणि नृत्याचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१५ वाजता तबलावादक ओजस अधिया यांचे तबलावादन आणि कथ्थक नृत्यांगना दुर्गा आर्या यांचे कथ्थक नृत्य सादर होणार आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजल्यापासून प्रख्यात शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील यांचे गायन आणि पद्मश्री पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे सरोदवादन सादर होणार आहे. सरोदवादनासाठी पं. मुकुंदराज देव यांची तबल्यावर साथसंगत लाभणार आहे. याशिवाय, कथ्थक नृत्यांगना विधा लाल आणि गौरी दिवाकर यांची कथ्थक जुगलबंदी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

या महोत्सवात तबल्यावर रोहित देव, पखवाजवर महावीर गंगाणी, गायनासाठी श्रीरंग टेंबे आणि वैभव मंकड, हार्मोनियमवर सिद्धेश बिचोलकर व शुधांशू घारपुरे, तर सितारवर झुबेर शेख यांची साथ लाभणार आहे.

भारतीय शास्त्रीय संगीत आणि कथ्थक नृत्याच्या रसिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री गणेश कल्चरल अकॅडमी, ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

कानडा राजा पंढरीचा’मधून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २५ जुलै रोजी मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

बाबा नीम करोली यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे-.उत्तराखंड सरकार

vishwatmaklokswamivarta

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित  ‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ‘राजा शिवाजी’सिनेमाचं वादळ, मोडले कमाईचे रेकॉर्ड्स!

vishwatmaklokswamivarta

१९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (MIFF) खुल्या चर्चासत्रात चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जबाबदार वापरावर भर देण्यात आला.

निर्माते दिग्दर्शक अमित जानी यांचा “काला हिरण: द बैटल फॉर लिगेसी’ या आगामी चित्रपटामुळे बॉलीवूड अभिनेता सलमान खानला दिल्ली हायकोर्टातून मोठा झटका

संगीत, संस्कृती आणि राष्ट्राभिमानाचा जागर : किल्ले पुरंदरावर ‘जयतु शंभू’ भव्य सांस्कृतिक कार्यक्रम