vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जागतिक रोजगाराच्या संधींसाठी ‘जीएसएमएआय’सोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या ‘महिमा’ उपक्रमातून युवकांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी

जागतिक रोजगाराच्या संधींसाठी ‘जीएसएमएआय’सोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-महाराष्ट्राच्या ‘महिमा’ उपक्रमातून युवकांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी…

मुंबई, प्रतिनिधी : जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता, महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्यांना आंतरराष्ट्रीय संधींची जोड देणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल स्किल्स मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी, परदेशी भाषांचे ज्ञान आणि जागतिक कौशल्य यांच्यात समन्वय साधण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

नवी दिल्लीतील आयटीसी मौर्या येथे जागतिक मनुष्यबळ गतिशीलतेमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी, १७ संस्थापक संस्था, शासकीय प्रतिनिधी, राजनैतिक दूतावास, राज्य सरकारे आणि उद्योगपतींना एकत्र आणणाऱ्या ‘ग्लोबल स्किल्स मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया’ (जीएसएमएआय)ची १२ ऑक्टोबर रोजी औपचारिक स्थापना झाली.यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, खासदार तथा संसदेच्या कामगार, वस्त्रोद्योग आणि कौशल्य विकासविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष शशांक मणी, डेन्मार्कचे भारतातील राजदूत रास्मस अबिल्डगार्ड क्रिस्टेन्सन, जर्मनीचे उपराजदूत जॉर्ज एन्झवायलर, इटलीच्या दूतावासाच्या उपप्रमुख ऑरोरा रुसी, ओडिशा शासनाचे सचिव भूपेंद्र सिंह पूनिया, टीमलीज डिजिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीती शर्मा, क्वेस कॉर्पचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी लोहित भाटिया, बॉर्डरप्लसचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक कुमार, ‘जीएसएमएआय’चे संस्थापक अध्यक्ष अजय खन्ना, मॅजिक बिलियनचे सहसंस्थापक बसब बॅनर्जी, तसेच गतीह फाउंडेशनचे पदाधिकारी, महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा आणि विविध देशांचे राजनैतिक प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या कौशल्यांच्या बळावर परदेशात उत्कृष्ट रोजगाराच्या संधी मिळाव्यात. महाराष्ट्रातील अगदी दुर्गम भागातील तरुण-तरुणींना जगातील कोणत्याही देशात करिअर घडविण्याचा आत्मविश्वास मिळावा, यासाठी आवश्यक कौशल्ये, आर्थिक सहाय्य आणि संस्थात्मक पाठबळ उपलब्ध झाले पाहिजे. जागतिक रोजगाराच्या संधी केवळ काही मोजक्या लोकांपुरत्या मर्यादित न राहता राज्यातील सर्वसामान्य युवकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे.उद्घाटन सोहळ्यात ‘स्थानिक कौशल्य, जागतिक महत्त्वाकांक्षा’ विषयावर चर्चा

परराष्ट्र मंत्रालयाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी ‘जीएसएमएआय’च्या लोगोचे व वेबसाइटचे अनावरण केले. ते म्हणाले की, भारताच्या जागतिक कौशल्य गतिशीलतेकडे केवळ कामगारांचे स्थलांतर म्हणून न पाहता, तरुणांना अनुभव मिळवण्याची, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची आणि भारताच्या विकासात योगदान देण्याची मोठी संधी म्हणून पाहिले पाहिजे.

‘जीएसएमएआय’चे संस्थापक अध्यक्ष अजय खन्ना यांनी जागतिक रोजगाराचे विश्वासार्ह मार्ग तयार करण्यासाठी उद्योग क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “‘जीएसएमएआय’मुळे आपल्याला सोयीपेक्षा विश्वासार्हतेला आणि तात्पुरत्या तडजोडीपेक्षा संस्थात्मक उभारणीला प्राधान्य देण्याची संधी मिळाली आहे.”उद्घाटन सोहळ्यात ‘स्थानिक कौशल्य, जागतिक महत्त्वाकांक्षा’ विषयावर चर्चा

परराष्ट्र मंत्रालयाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी ‘जीएसएमएआय’च्या लोगोचे व वेबसाइटचे अनावरण केले. ते म्हणाले की, भारताच्या जागतिक कौशल्य गतिशीलतेकडे केवळ कामगारांचे स्थलांतर म्हणून न पाहता, तरुणांना अनुभव मिळवण्याची, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची आणि भारताच्या विकासात योगदान देण्याची मोठी संधी म्हणून पाहिले पाहिजे.

‘जीएसएमएआय’चे संस्थापक अध्यक्ष अजय खन्ना यांनी जागतिक रोजगाराचे विश्वासार्ह मार्ग तयार करण्यासाठी उद्योग क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “‘जीएसएमएआय’मुळे आपल्याला सोयीपेक्षा विश्वासार्हतेला आणि तात्पुरत्या तडजोडीपेक्षा संस्थात्मक उभारणीला प्राधान्य देण्याची संधी मिळाली आहे.”विषयावरील परिसंवादात ओडिशा शासनाचे आयुक्त-सह-सचिव भूपेंद्र सिंह पूनिया, टीमलीज डिजिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीती शर्मा आणि क्वेस कॉर्पचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी लोहित भाटिया यांनी सहभाग घेतला. बॉर्डरप्लसचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक कुमार यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले, तर मॅजिक बिलियनचे सहसंस्थापक बसब बॅनर्जी यांनी समारोप केला. भारतीय युवकांना जागतिक रोजगारासाठी तयार करताना कौशल्य विकास, उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षण, भाषेचे ज्ञान, सांस्कृतिक समज आणि रोजगारानंतरचे सहकार्य यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.राज्यातील कौशल्य विकास व आंतरराष्ट्रीय रोजगार क्षेत्रात दुवा साधणार– कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील युवकांना जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाश्वत मार्ग निर्माण करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग काम करत आहे. महाराष्ट्र हे उद्योग, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात सातत्याने पुढाकार घेणारे राज्य आहे. ‘जीएसएमएआय’च्या सहकार्यामुळे राज्यातील कौशल्य विकास व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय रोजगार क्षेत्र यांच्यातील दुवा अधिक मजबूत होईल. युवकांना जागतिक गरजांनुसार प्रशिक्षित करून त्यांच्या क्षमता आणि गुणवत्तेला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील युवक केवळ जागतिक रोजगाराच्या संधींचा लाभ घेणार नाहीत, तर आपल्या ज्ञानातून, अनुभवातून आणि कौशल्यातून देशाच्या आर्थिक प्रगतीतही योगदान देतील, असा विश्वास कौशल्य मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.

‘महिमा’च्या माध्यमातून परदेशात रोजगाराच्या संधी : अपर मुख्य सचिव मनीषा वर्माकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. जागतिक स्तरावरील मनुष्यबळाच्या मागणीचे रोजगाराच्या संधींमध्ये रूपांतर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक देशातील व्यवसायाधारित विशिष्ट मागणी ओळखून जिल्हास्तरावरील युवकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. उद्योग भागीदार, नियोक्ता नेटवर्क, भरती कौशल्ये आणि प्रशिक्षण क्षमता यांच्यात समन्वय साधला जात आहे. महाराष्ट्र शासनाने या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी ‘महिमा’ (महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था) या विशेष कलम ८ अंतर्गत कंपनीची स्थापना केली आहे. परदेशातील रोजगाराच्या संधी सुलभ करणे आणि जागतिक कौशल्य गतिशीलतेला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्राच्या कौशल्य विकास परिसंस्थेत १,००० हून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १,८०० हून अधिक तांत्रिक शिक्षण संस्थांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मनुष्यबळ विकसित करण्यात या संस्था मोलाची भूमिका बजावत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

००००

संबंधित पोस्ट

लोकसंवादातून शासनाच्या योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्यास गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा – मंत्री आदिती तटकरे कौशल्य विकास व रोजगार तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचीही माहिती नागरिकांना देण्यात आली.

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जनगणना मोहिमेत दोन प्रगणकांनी रचला नवा आदर्श    प्रशासनाकडून सत्कार कडक उन्हातही विक्रमी कामगिरी !

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनामहाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात ..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका  पाणी बचतीबाबतचे नियोजन• नागरिकांमध्ये विविध माध्यंमाद्वारे पाणी बचतीवाचत आवाहन करण्यात येत आहे.

राज्यभरात एफडीएची औषधांवरील आक्षेपार्ह जाहिराती व मिसब्रँडेड औषधसाठ्यांविरुद्ध धडक मोहीम अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती

सौरऊर्जा प्रकल्पांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक हिस्सा कमी करण्याबाबत-समिती स्थापन करणार- मंत्री उदय सामंत