vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात: अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

राज्यात: अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

[ मुंबई प्रतिनिधी: अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही चांगलाच वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. ओबीसी आरक्षणावरून विधीमंडलात भाजप आक्रमक होणार असून, रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण विरोधात असल्याचा आरोप विरोधकांचा आहे.

विधीमंडळ कामकाज सुरू होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणारा आहे. विधानभवनात थोड्याच वेळात प्रमुख नेत्यांची बैठक आहे. विरोधकांना प्रत्युत्तर देण्याबाबत बैठकीत चर्चेची शक्यता आहे. नवाब मलिकांचा राजीनाम्यासाठी भाजप आग्रही आहे. तर ओबीसी आरक्षण रद्द मुद्दाही विधानसभेत गाजणार आहे. त्यामुळे रणनीती ठरवण्यासाठी अजित पवार, अशोक चव्हाण, सुभाष देसाईंसह मविआचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिलाय. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारलाय. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

 

त्यामुळे मुदत उलटलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देशही कोर्टानं दिले.

संबंधित पोस्ट

सजक तरुणाने दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधान यामुळे तरुणीचे प्राण वाचले. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या तरुणाचे कौतुक करत त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

रामकृष्ण मिशन मुंबईच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण रामकृष्ण मिशनने शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांना संस्कारित करावे – राज्यपाल रमेश बैस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण

रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव सादर करा — मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

vishwatmaklokswamivarta

कॉंग्रेसचा आंदोलन दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढत भाजप सरकार विरुध्द हल्लाबोल…

vishwatmaklokswamivarta

६ जुलै या दिवशी असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने …..आषाढी एकादशी – इतिहास आणि महत्त्व