vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  लवकरच दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करू शकतात.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  लवकरच दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करू शकतात.

हैदराबाद प्रतिनिधी

 

मोदींना टक्कर देण्यासाठी KCR यांची लवकरच राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री

पक्षाचं नाव बदलण्यासाठी टीआरएस पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  लवकरच दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय पक्षाची  घोषणा करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या  मुहूर्तावर सीएम केसीआर आपल्या राष्ट्रीय पक्षाच्या नावाची घोषणा करतील, असं मानलं जात आहे.

विजयादशमी दिवशी 5 ऑक्टोबरला हैदराबाद तेलंगणा भवनमध्ये  टीआरएस (TRS) पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. एएनआयच्या वृत्तानुसार, सीएम केसीआर हैदराबादच्या बैठकीनंतर राष्ट्रीय राजकारणाबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल बोलू शकतात. पक्षाचं नाव बदलण्यासाठी टीआरएस पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार असल्याचंही मानलं जात आहे.

केसीआर 9 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय राजधानीत जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. टीआरएस नेते श्रीधर रेड्डी म्हणाले, “देशातील लोक एक मजबूत आणि चांगलं नेतृत्व शोधत आहेत. कारण, एनडीए सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे.” तर

 

, दुसरीकडं तेलंगणा पीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष आणि माजी खासदार मधू गौड यास्की म्हणाले, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्यात काही अर्थ नाही. त्यांनी तेलंगणातील जनतेचा विश्वासघात केलाय आणि आता ते देशाच्या जनतेचा विश्वासघात करू इच्छित आहेत, अशी त्यांनी टीका केलीय.

 

 

संबंधित पोस्ट

लोकशाहीच्या या उत्सवात नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये मतदारराजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

vishwatmaklokswamivarta

काँग्रेसचे अस्तित्व राहिलं कुठं?राधाकृष्ण विखे पाटील यांचा कॉंग्रेसला खोचक टोला…

आमच्यात कोणीही नाराज नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ५० आमदार आमचे सर्व अधिकार हे आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत शंभूराजे देसाई

भाजपा विधिमंडळ नेते आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विटर वर काय म्हणतात ते पहा!

vishwatmaklokswamivarta

महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत मीडियामध्ये सादर करण्यात आलेल्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला शरद पवार यांनी दिला

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे एक पाऊल मागे; ट्विटरवरुन नाव आणि चिन्ह हटवले…

vishwatmaklokswamivarta