vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारतीय रेल्वेची विशेष बातमी, रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड…

 भारतीय रेल्वेची विशेष बातमी, रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड…

नवी दिल्ली प्रतिनिधी: प्रवास करत असाल आणि तुमची गाडी लेट असेल तर तुम्हाला मोठा दिलासा रेल्वेने दिला आहे. आता तुम्ही प्रवास करत असणारी एक्स्प्रेस तीन तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे रिफंड मिळणार आहेत. एवढच नाही तर नाश्ता-जेवणही फ्री मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीच ही मोठी घोषणा केली आहे.

 

तरीही पूर्ण रिफंड मिळेल

अनेकदा एक्स्प्रेस विविध कारणांमुळे लेट धावत असतात. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात तिकिट रद्द केल्यास पूर्ण रिफंड मिळत नाही. पण आता यात बदल करण्यात आलाय. एक्स्प्रेस तीन तासांपेक्षा जास्त लेट असल्यास तिकिट रद्द केली तरी पूर्ण रिफंड मिळणार आहे. मग ती तिकिट कन्फर्म असो किंवा मग RAC.तिकिट खिडकीवर काढलेली किंवा ऑनलाईन काढलेली तिकिट असली तरीही पूर्ण रिफंड मिळेल.

 

अनेकवेळा गाड्या उशिरा धावतात

हिवाळ्याच्या मोसमात अनेकवेळा धुक्यात गाड्या उशिराने धावतात, त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, परंतु अशा परिस्थितीत रेल्वे तुम्हाला अनेक सुविधा देते. मात्र, आता तुमची गाडी तीन तास उशिराने असेल तर तिकीट परताव्याची संपूर्ण रक्कमही परत केली जाणार आहे.

 

तिकीट रद्द केल्यास संपूर्ण भरपाई दिली जाणार

धुक्यामुळे तुमच्या रेल्वेला 3 तास किंवा त्याहून अधिक उशीर झाल्यास प्रवासी तिकीट रद्द करु शकतात आणि संपूर्ण नुकसान भरपाई मिळवू शकतात, असे रेल्वेने म्हटले आहे. तसेच कन्फर्म तिकिटाव्यतिरिक्त, RAC तिकिटावर पूर्ण परतावा देखील दिला जाईल, असे रेल्वेकडून साघण्यात आले आहे.

 

मोफत जेवण आणि पाणी उपलब्ध

तुम्ही काउंटरवरून किंवा ऑनलाइन तिकीट बुक केल्याचे भारतीय रेल्वेने म्हटले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये, तुम्हाला संपूर्ण परतावा मिळेल. किंवा तुमची ट्रेन लेट झाली तर तुम्हाला मोफत खाण्यापिण्याची सुविधा मिळेल, पण ही सुविधा तुम्हाला काही ठराविक रेल्वेमध्येच मिळेल.

 

तिकिटाचे पैसे परत कसे मिळणार?

जर तुम्ही काउंटरवर रोख रक्कम भरुन तिकीट खरेदी केले असेल, तर तुम्हाला त्वरित रोख रक्कम मिळेल. किंवा, जर तुम्ही काउंटरवर तिकीट बुक केले असेल आणि डिजिटल मोडमध्ये पैसे दिले असतील तर तुम्हाला पैसे ऑनलाइन मिळतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी श्री.किशन जावळे यांच्या हस्ते पनवेलमध्ये ‘क्षयरोग दुरीकरण मोहिमेचे उद्घाटन रायगड जिल्ह्यात आजपासून ‘क्षयरोग दुरीकरण मोहिमेस’ सुरूवात..

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’च्या जयघोषाने दुमदुमणार नांदेड • विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून आजपासून जनजागृती मोहीम• चिमुकल्या विजेत्यांचा मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान..

vishwatmaklokswamivarta

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप राज्यातील १ कोटी ६८ लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ

vishwatmaklokswamivarta

लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त ,साहित्यमदिर वाशी,राष्ट्रीय सन्मानसोहळा नवी मुंबई येथे संपन्न”

नवी मुंबईत ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी**प्रशासन व समाजघटक सज्ज**ऐतिहासिक समागमासाठी प्रशासन, धार्मिक संस्था व सामाजिक संघटनांचा समन्वय; व्यापक नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेत

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवन येथे”जावे विनोदाच्या गावा” विशेष कार्यक्रम• श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन• “लोकसेवेचा लोकजागर” ग्रंथाचे प्रकाशन