vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निवडणूक विभाग मतदारराजाचे दारी…जिल्ह्यात 21 एप्रिलपासून घरून मतदानाला सुरूवात*मतदारांनी घरी थांबण्याचे आवाहन

निवडणूक विभाग मतदारराजाचे दारी…जिल्ह्यात 21 एप्रिलपासून घरून मतदानाला सुरूवात*मतदारांनी घरी थांबण्याचे आवाहन

 

बुलडाणा, प्रतिनिधी: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024मध्ये प्रथमच 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले दिव्यांग मतदारांनी विहीत मुदतीत केलेल्या मागणीनुसार त्यांना घरपोच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात 2 हजार 171 ज्येष्ठ नागरिक आणि 692 दिव्यांग असे एकूण 2 हजार 863 मतदारांच्या घरी जाऊन मतदान पथकामार्फत मतदान करुन घेण्यात येणार आहे. हे मतदान टपाली मतपत्रिकेद्वारे होणार असून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या कामासाठी 101 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात दि. 21 ते 23 एप्रिल 2024 दरम्यान सदर मतदान प्रक्रिया होणार आहे.

 

बुलडाणा विधानसभा मतदारसंघात 112 ज्येष्ठ नागरिक, 84 दिव्यांग असे 196, चिखली विधानसभा मतदारसंघात 318 ज्येष्ठ नागरिक, 96 दिव्यांग असे 414, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात 539 ज्येष्ठ नागरिक, 89 दिव्यांग असे 628, मेहकर विधानसभा मतदारसंघात 820 ज्येष्ठ नागरिक, 283 दिव्यांग असे सर्वाधिक 1 हजार 103, खामगाव विधानसभा मतदारसंघात 120 ज्येष्ठ नागरिक, 83 दिव्यांग असे 203, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 262 ज्येष्ठ नागरिक, 57 दिव्यांग असे 319, असे 2 हजार 171 आणि दिव्यांग 692 असे एकूण 2 हजार 863 मतदारांना घरपोच मतदान सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे.

 

85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदार असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघ येथे 196 मतदारांसाठी 10 पथक, चिखली येथे 414 मतदारांसाठी 20 पथक, सिंदखेड राजा येथे 628 मतदारांसाठी 19 पथक, मेहकर येथे 1 हजार 103 मतदारांसाठी 32 पथक, खामगाव येथे 203 मतदारांसाठी 10 पथक, जळगाव जामोद येथे 319 मतदारांसाठी 10 पथक, असे एकूण 101 पथक दि. 21 एप्रिलपासून घरोघरी जाऊन मतदान प्रक्रिया राबवणार आहे. सदर मतदान पथकांमध्ये 2 मतदान अधिकारी हे सुक्ष्म निरीक्षक, 1 व्हिडीओग्राफर, 1 पोलिस कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

सदर मतदान प्रक्रिया पारदर्शीपणे, तसेच मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी उमेदवार स्वत: अथवा आपला प्रतिनिधी नियुक्त करुन मतदान प्रक्रियेचे निरीक्षण करु शकतात. याप्रक्रियेमध्ये मतदारांना टपाली मतपत्रिकेवर खुण करुन आपले मतदान नोंदविता येईल. तसेच मतदान नोंदविल्यानंतर मतदारांच्या बोटाला पक्की शाईची खुण करण्यात येणार आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेचे टिमकडून चित्रीकरण केले जाणार आहे.

 

अंध व्यक्तींसाठी मतदान करताना विशेष सोय करण्यात आली आहे. निवडणुकीत 21 उमेदवार आणि 1 नोटा असल्याने मतपत्रिकेचे दोन भाग असणार आहे. एका मतपत्रिकेवर 16 उमेदवार आणि उर्वरीत उमेदवार दुसऱ्या मतपत्रिकेवर असणार आहे. अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका पुरविण्यात येणार आहे. तसेच अंध दिव्यांग व्यक्तींना सोबत्याची मदत घेऊन देखील मतदान करता येणार आहे. दररोज मतदान संपल्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सर्व पथकातील टपाली मतपत्रिकेचे एकत्रिकरण करण्यात येवून सर्व टपाली मतपत्रिकेचे पाकिटे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

 

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान पथकांचा तारखेनिहाय नियोजन केलेले असून त्यास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात आली आहे. याबाबत मतदार, तसेच उमेदवार यांनादेखील कळविण्यात आले आहे. तरी या कालावधीत उपरोक्त मतदारांनी बाहेरगावी जाऊ नये, अथवा गैर

संबंधित पोस्ट

मुंबईकरांना पाणीटंचाई – दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशीच मुंबईकरांना पाणी टंचाई …

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन;फक्त मान्यता प्राप्त शाळांमध्ये प्रवेश घ्यावा

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

औद्योगिक प्रयोजनासाठी अकृषिक सनदीची आवश्यकता नाही-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची माहिती · शासन परिपत्रक जारी ; उद्योग घटकांना दिलासा

vishwatmaklokswamivarta

जगात शांततेसाठीचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो – योगगुरू रामदेव बाबा

सैन्य भरतीःऑनलाइन अर्ज मागविले