vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचीफी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचीफी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी: बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही १०० टक्के फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. ७ ऑक्टोबर, २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली.

 

महाराष्ट्र शासनाने राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा सर्व मुलींची १०० टक्के फी शासन भरेल, अशी घोषणा करुन त्याची अंमलबजावणी होण्याबाबत अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली. त्यानुसार मंत्रीमंडळाच्या बैठकीत रितसर मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित केला. व्यावसायिक अभ्यासक्रमांची मुलींची १०० टक्के फी सरकार भरेल, यावर अनेकांनी आनंद व्यक्त करताना बिगर व्यावसायिक (Non Professional) अभ्यासक्रमांचीही (कला, वाणिज्य, विज्ञान इ.) १०० टक्के फी शासनाने भरावी, असा मुद्दा उपस्थित केला. त्या अनुषंगाने मंत्री श्री.पाटील यांनी स्पष्टीकरण केले.

 

राज्यात मुलींचे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाचे प्रमाण एकूण विद्यार्थी लोकसंख्येमध्ये ३६ टक्के असून प्रगतीशील राज्यामध्ये हे प्रमाण वाढण्याची आवश्यकता विचारात घेऊन मुलींची शिक्षण फी १०० टक्के माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

00000

 

बी.सी.झंवर/विसंअ/

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी अच्युत मोरे यांची निवड

सेसफंड योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण…

निवडणुक निरीक्षकांकडून व्यवस्थेची पाहणी-स्ट्राँग रुम, कंट्रोल रूम, निवडणूक अधिकारी कार्यालय, मतदान केंद्रांना भेट

vishwatmaklokswamivarta

एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी

vishwatmaklokswamivarta

शीख बांधवाना विवाह नोंदणी करण्याचे आवाहन