vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचीफी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचीफी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी: बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही १०० टक्के फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. ७ ऑक्टोबर, २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली.

 

महाराष्ट्र शासनाने राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा सर्व मुलींची १०० टक्के फी शासन भरेल, अशी घोषणा करुन त्याची अंमलबजावणी होण्याबाबत अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली. त्यानुसार मंत्रीमंडळाच्या बैठकीत रितसर मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित केला. व्यावसायिक अभ्यासक्रमांची मुलींची १०० टक्के फी सरकार भरेल, यावर अनेकांनी आनंद व्यक्त करताना बिगर व्यावसायिक (Non Professional) अभ्यासक्रमांचीही (कला, वाणिज्य, विज्ञान इ.) १०० टक्के फी शासनाने भरावी, असा मुद्दा उपस्थित केला. त्या अनुषंगाने मंत्री श्री.पाटील यांनी स्पष्टीकरण केले.

 

राज्यात मुलींचे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाचे प्रमाण एकूण विद्यार्थी लोकसंख्येमध्ये ३६ टक्के असून प्रगतीशील राज्यामध्ये हे प्रमाण वाढण्याची आवश्यकता विचारात घेऊन मुलींची शिक्षण फी १०० टक्के माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

00000

 

बी.सी.झंवर/विसंअ/

संबंधित पोस्ट

रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी राजस्थानमध्ये लाँच केली Jio 5G सेवा

vishwatmaklokswamivarta

आज महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस देशभरात ड्राय डे म्हणून घोषित

भारत रंग महोत्सवात तीन मराठी नाटके

vishwatmaklokswamivarta

महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित महावाङ्मय प्रकाशित करण्यात येईल – मंत्री अतुल सावे

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा – पालकमंत्री डॉ .सुरेश खाडे

बेस्ट ब्युटीशियन पुरस्कार वितरण साहळा उत्साहात; 23 रक्तदात्यांनी केलं रक्तदान