vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भगवती रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण करणार- मंत्री उदय सामंत

भगवती रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण करणार- मंत्री उदय सामंत

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी : बोरिवली येथे महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. सुरुवातीला या जागेवर निवासी इमारती होत्या. या इमारतींचे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर काम सुरू झाले. या रुग्णालय विस्तारीकरणाचे काम ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 

याबाबत सदस्य मनीषा चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य असलम शेख, सुनील राणे यांनी भाग घेतला.

 

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, रुग्णालय विस्तारीकरण कामाच्या दर्जाबाबत चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. विस्तारीकरण कामात एखाद्या मेडिकल स्टोअरला जागा देण्यात आली असल्यास त्याचीही पडताळणी करण्यात येईल. मालाड येथील रुग्णालय सुरू करण्याबाबत सूचना देण्यात येतील. तसेच मुंबई शहरातील, उपनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय, भगवती रुग्णालय व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयातील समस्या व प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

 

००००

 

नीलेश तायडे/विसंअ/

संबंधित पोस्ट

आर टी ई शाळांचे चालक आंदोलनाच्या पावित्र्यात…

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्काराकरिता अर्ज करावेत…

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पर्जन्यमान) दि. ०८.०९.२०२५ (मि.मी.)सकाळी ८.०० वाजेपर्यंत

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी,विरोधकांना धक्काबुक्की., भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन. विरोधी पक्षाने कामकाजावर बहिष्कार टाकला.

vishwatmaklokswamivarta

मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्राला भरती, मुंबई पोलिसांकडून सतर्क राहण्याचे आवाहन

राज्य उत्पादन शुल्कची अवैध मद्य विक्रीवर कार्यवाही सुरूच