vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पाथ्रीकर कॅम्पसला भेट..

मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पाथ्रीकर कॅम्पसला भेट..

बदनापूर,  (प्रतिनिधी)-मत्स्योदरी आभियांत्रिकी महाविद्यालयातीलविद्यार्थ्यांनी बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्पस येथे सुरू असलेल्याबांधकामाला भेट देऊन बांधकामाचे बारकावे प्रत्यक्ष बघितले.महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या अभ्यासदौर्‍यात स्थापत्य विभागाच्याविद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.मत्स्योदरी आभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागातर्फे

विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौर्‍याचे आयोजन केले होते. बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या पाथ्रीकर कॅम्पस येथे सुरूअसलेल्या इमारत बांधकामाला या विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी सुरू असलेल्या विविध बांधकामाचा अभ्यास पाहणी या विद्यार्थ्यांनीकेली. या प्रसंगी मोरया कंन्स्ट्रक्शनचे अभियंता मुकेश सोनवणे यांनीइमारतीचा स्लॅबपासून ते बेसमिंटपर्यंत होणार्‍या कामाची माहिती दिली.पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष काम करताना येणार्‍या अडचणी यावेळीत्यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवल्या. प्रत्यक्ष बांधकाम करत असतानाअभियंत्याने काय काळजी घ्यावी.बांधकाम मजबूत होण्याबरोबरच आर्थिक नियोजन कसे करावे या बाबत ही मुकेशसोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाथ्रीकर कॅम्पसचेअध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या वतीने संस्थेचे प्रतिनिधी नंदकिशोरनाईकवाडे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या वेळी मत्स्योदरीआभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. प्रवीण आव्हाड, प्रा. निता वायाळा,

प्रा. जयेश त्रिवेदी, प्रा. नंदकिशोर वाघ, प्रा. प्रसाद देशमुख यांनीविद्यार्थ्यांना तांत्रिक बाबींबाबत मार्गदर्शन केले. सदरील अभ्यासदौराप्राचार्य डॉ. एस. के. बिरादार, उपप्राचार्य प्रा.आर. एल. करवंदे, प्रा.के.टी. खर्जुले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला. याअभ्यासदौर्‍यामध्ये स्थापत्य विभागाच्या विद्यार्थी – विद्यार्थीनींनीथेट सहभाग नोंदवला होता.

८- मत्स्योदरी आभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बदनापूरयेथील पाथ्रीकर कॅम्पस येथे सुरू असलेल्या बांधकामाला भेट देऊनबांधकामाचे बारकावे प्रत्यक्ष बघितले. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या याअभ्यासदौर्‍यात स्थापत्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

संबंधित पोस्ट

नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता मतदारांना 15 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर..

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्यालाभार्थ्यांस आर्थिक मदतीचे वितरण..

दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

निवडणुकीदरम्यान तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार*आठवड्यात पाच दिवस ड्राय डे जाहिर..

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिका जालना अंतर्गत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट सहयोगाने दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान “उजास” प्रकल्पाचा उदघाटन व शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta