vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०२४ साठी**अर्ज करण्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे आवाहन*

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०२४ साठी**अर्ज करण्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे आवाहन*

 

सातारा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०२४ साठी पात्र इच्छुक व्यक्ती व संस्थांनी जिल्हयाचे विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांचे कार्यालयात विहित प्रपत्रात १५ जानेवारी २०२५ अखेर अर्ज करावेत, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभाग साताराचे विभागीय वन अधिकारी एच.एस. वाघमोडे यांनी केले आहे.

सामाजिक वनीकरण विभाग साताराकडून वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2024 देण्याचे प्रस्तावित आहे. हा पुरस्कार महसूल विभागस्तर व राज्यस्तरावरील व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम, विभाग व जिल्हा या संवर्गात देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह, प्रशस्तीपत्र या शिवाय महसूल विभागस्तरावरील प्रत्येक संवर्गामध्ये २ पुरस्कार, प्रथम रु. ५० हजार व द्वितीय रु. 30 हजार, राज्यस्तरावरील प्रत्येक संवर्गामध्ये ३ पुरस्कार, प्रथम रु. १ लाख, द्वितीय रु. ७५हजार, व तृतीय रु. ५० हजार, तसेच वृक्षमित्र पुरस्कार वृक्षारोपणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या ३ खाजगी संस्थांना प्रोत्साहनपर प्रत्येकी रु. २५ हजार असे आहे.

यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या क्षेत्रात मागील ३ वर्ष (सन २०२१,२०२२ आणि २०२३) मध्ये केलेले कार्य उल्लेखनीय असणे ही किमान योग्यता आहे.

 अर्ज विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांचे कार्यालयात उपलब्ध असून वन विभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर देखील हा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक माहीतीसाठी Website: www.mahaforest.gov.in, या संकेतस्थळावर ‘वनसंपदा’ नवीन प्रशासकीय इमारत, फॉरेस्ट कॉलनी जवळ, गोडोली-सातारा, दुरध्वनी क्र. 02162-295109, Email: dfosatara@gmail.com वर संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. वाघमोडे यांनी केले आहे.000

संबंधित पोस्ट

राज्यातील महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत सुलभपणे पोहोचावी या उद्देशाने महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा (#आयसीडीएस) योजनेच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण

सांगली जिल्ह्यात 2 फेब्रुवारी पर्यंत मनाई आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल -डिझेल च्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरविल्या जात मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

 शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

महावीर जयंतीला कत्तलखाने, मांसविक्री बंद