vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

जिल्हास्तरीय शालेय(मुले) फुटबॉल लिग स्पर्धा; 10 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

जिल्हास्तरीय शालेय(मुले) फुटबॉल लिग स्पर्धा; 10 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

 

 खेळ प्रतिनिधी

बुलडाणा,: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा फुटबॉल संघटना बुलढाणाद्वारे 13 वर्ष वयोगटातील शालेय प्रतिभावंत खेळाडुंचा शोध घेण्यासाठी जिल्हास्तरीय फुटबॉल (मुले) सन 2025-26 शालेय लिग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 10 जानेवरीपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस. महानकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळेतील 13 वर्ष वयोगटातील खेळाडुंना स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता जिल्ह्यातील विविध शाळेतील संघाची नोंदणी जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे ऑफलाईन विनामूल्य नोंदणी करून संघाची यादी दि.10 जानेवारीपर्यंत कार्यालयात जमा करून प्रवेश निश्चित करावा. सदर स्पर्धेसाठी खेळाडुंची वयोमर्यादा 1 जानेवारी 2012 नंतरचा जन्म झालेला खेळाडु सदर स्पर्धेकरीता पात्र राहील. स्पर्धेची तारीख आपणास नंतर कळविण्यात येईल.

सदर स्पर्धेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त संघानी सहभाग नोंदवुन स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी एन.आर. वानखेडे 9960434487, एस.एस.केळे 9423446516 व डॉ. जे. डब्ल्यु मोहोड 9405734403 यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.00000000

संबंधित पोस्ट

पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नूतनीकृत दालनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते ‘राजमाता महोत्सव’चा शुभारंभ;बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशिल – ना.प्रतापराव जाधव

गब्बर ॲक्शन संघटनाने तर्फे पोलीस आयुक्त परवीन पवार यांच्या अभिनंदन

जिवती येथील शेतकऱ्यांच्या वन जमिनींच्या पट्ट्यांसंदर्भात बैठक घेणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अनुकंपा मेळाव्यातून नियुक्ती प्रक्रियेला गती*नियुक्ती प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्यात येईल – जिल्हाधिकारी*

vishwatmaklokswamivarta