vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वाल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा प्रश्न मंजुषा-स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम

वाल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा प्रश्न मंजुषा-स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम

बदनापूर, (प्रतिनिधी)-बदनापूर येथे शासकीय समाज कल्याण शाळेत तालूकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये बिट दाभाडी, बिट बदनापूर व बिट गेवराई बाजार या तीनही बिटातील शाळांचे लहान गट व मोठा गट अशा दोन्ही गटाच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाल्हा (केंद्र कंडारी बिट गेवराई बाजार) या शाळेतील वर्ग सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवलाआहे.

यावेळी यशस्वी विद्यार्थी ज्ञानेश्वरी योगेश आगलावे, ऋतुजा बाबासाहेब कोल्हे, युवराज रामेश्वर तायडे यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांची

निवड बदनापूर तालुक्यामधून जिल्हास्तरासाठी झाली आहे. यापूर्वी शालास्तर,केंद्रस्तर,बितस्तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत याच शाळेतील मोठा गट प्रथम क्रमांकावर विजयी झाला होता. यावेळी शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ,भालेराव,गटशिक्षण अधिकारी क्षिरसागर,गट समन्वयक झुंबड,म्हस्के,खिल्लारे, बालाजी मदन, पाटील,जगदाळे आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी परिश्रम घेणारे मुख्याध्यापक पी. यु. आरसुड, गोंदीकर,वाघ, लिंभोरे, शिनगारे,नवसुपे,दिपाली खैरे -तांबेकर यांचेही अभिनंदन करण्यात आले.

०००००फोटो ओळी५-बदनापूर येथे शासकीय समाज कल्याण शाळेत तालूकास्तरीय प्रश्नमंजुषास्पर्धा घेण्यात आली. यात वाल्हा येथील वर्ग सहावी ते आठवीच्याविद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद, ठाणे येथे नशामुक्त भारत अभियानाची शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta

आयआयएमसी’ची एमए आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; ई-समुपदेशनासाठी नोंदणीची अंतिम तारीख 7 जून 2026 तीन नवीन विशेष एमए अभ्यासक्रमांमुळे आयआयएमसीच्या सहा शैक्षणिक परिसरांमधील अभ्यासक्रमांमध्ये वाढ

यशदा पुणे येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉटर प्लस मानांकनाविषयी सादरीकरणाचा मान*

शंखनाद महोत्सव : ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ उद्बोधन सत्र !**राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते!* – मेजर गौरव आर्य, चाणक्य फोरम्

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या – पालकमंत्री नितेश राणे जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक संपन्न

अमरावतीच्या राज्य सेवाहक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती मंगळवारी मुंबई येथे पद व गोपनीयतेची शपथ..