vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविणार- माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविणार- माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : – भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गति देण्याच्या उद्देशाने रविवार 5 जानेवारी रोजी राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये जालना जिल्ह्यात या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून प्रत्येक बूथ पर्यंत पोहोचून जास्तीतजास्त नागरिक भाजपाशी जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार आहेत.

माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विकसित भारत घडविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश त्यादिशेने वाटचाल करत आहे. याच वाटचालीचा एक भाग म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्र घडवण्याचे ध्येय आपण सर्वांनी बाळगले आहे. भाजपची संघटना अधिक बळकट व्हावी आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे वर्चस्व वाढावे, यासाठी सदस्य नोंदणी अभियान महत्त्वपूर्ण आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्येक घराघरात पोहोचण्याचे काम या सदस्यता अभियानाद्वारे करावे लागेल. भाजपा पक्ष हा एक विशाल कुटुंब आहे. अधिक सदस्य नोंदणी केल्याने पक्षाची ताकद वाढते आणि आपण अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो, ही बाब लक्षात घेत अनेक सामाजिक कार्यकर्ते भाजपा परिवारात प्रवेश करत आहेत. आपण सर्वांनी ही भाजपचे सदस्यत्व स्वीकारून देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे व सर्वांनी रचनात्मक नियोजन करून प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित ठेवावे असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी केले आहे.बाबासाहेब पाटील कोलते प्रसिद्धीप्रमुख भारतीय जनता पार्टी जि.जालना

0000

संबंधित पोस्ट

गॅस सिलेंडर डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तींनी अतिरिक्त पैसे मागितल्यास कारवाई करण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ ! राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्जाची 17 जुलैपर्यंत अंतिम मुदत…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलवाहतुकीचा बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा सिंधुदुर्गात सुरु होणार आधुनिक फेरीबोट सेवा स्थानिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी, पर्यटन आणि रोजगारालाही चालना

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मिरमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत,८ वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद  पूंछ आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या ७ जणांचा शोध सुरू..

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावेॲपद्वारे प्रक्रिया सुलभ ; अनुदान बंद होऊ नये म्हणून प्रशासनाचे आवाहन