vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त १३ कर्मचाऱ्यांचा सन्मान

उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त १३ कर्मचाऱ्यांचा सन्मान..

 

ठाणे प्रतिनिधी – जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आज, दि. ०६ जानेवारी २०२५ रोजी, जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला.

जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे यांच्या शुभहस्ते १३ अधिकारी व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पेन्शन आदेश देऊन सन्मान करण्यात आला.‌

    या प्रसंगी मार्गदर्शन करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्याकरिता सदिच्छा दिल्या. त्याचबरोबर ग्रामीण भागात ३५ वर्ष पेक्षा अधिक काळ कामकाज केल्याबद्दल अभिनंदन केले. आरोग्य, शिक्षण तसेच विविध शासकीय योजना ग्रामस्थापर्यंत पोहोचवण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी यांनी मोलाचे कामकाज केले आहे. तसेच इच्छूक शिक्षकांनी अनुभवाचा विद्यार्थ्यांसाठी वेळ खर्च करण्यासाठी शिक्षण विभागात काम करू शकता असे आवाहन यावेळी केले.

   प्राथमिक शिक्षिका जान्हवी महाकाळ यांनी जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम नियोजन केल्याबद्द्ल आभार व्यक्त केले. ३५ वर्ष शिक्षक म्हणून कामकाज करता कुटुंब सदस्य तसेच सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

   यावेळी लेखाधिकारी शालेय पोषण आहार शिक्षण (प्राथमिक) विभागातील स्मिता नेरपगार, सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी कल्पना तोरवणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज देवकर तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डिसेंबर महिन्यातील शिक्षण विभाग प्राथमिक ११, सामान्य प्रशासन विभाग ०१, आरोग्य विभाग ०१ असे एकूण १३ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, पदविधर, हवालदार, आरोग्य सहाय्यक पुरुष या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.000

संबंधित पोस्ट

स्कूल बसच्या सुरक्षेसाठी नियमावली; तीन महिन्यांत सुरक्षा उपाययोजनांची पूर्तता करण्याचे निर्देश नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसचा परवाना निलंबित, रद्द होणार

vishwatmaklokswamivarta

अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश* 

vishwatmaklokswamivarta

पाणी हक्क समितीच्यावतीने ‘सर्वासाठी पाणी ‘अहवाल सादर…

जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयेआर्थिक वर्ष अखेरीस सुट्टीच्या दिवशीही सुरू- मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे 

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा वार्षिक योजना सन 2026 -2027 साठी 547.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता विकासकामांना गती, निधीचा प्रभावी वापर आणि वेळेत अंमलबजावणीवर भर

कन्यादान योजनेंतर्गत अर्थसहाय्यासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन