vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण प्रशिक्षण…

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण प्रशिक्षण…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी):-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस कालावधीच्या या प्रशिक्षण कार्यक्रमास बुधवार दि.८ रोजी सुरुवात होणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे.

  या प्रशिक्षणात व्यवसाय मार्गदर्शन तसेच या क्षेत्रातील विविध संधी, बाजारपेठ पाहणी, शासकीय योजनांची संपूर्ण माहिती देण्यात येईल. या प्रशिक्षणात तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये निर्जलीकरण (डिहायड्रेशन)चे प्रकार, त्यामधील उद्योग संधी, वर्किंग प्रिन्सिपल, व्हेजिटेबल कटिंग मशीन, ग्राइंडर मशीन, पॅकिंग, पिलिंग मशीन (साल काढण्याची मशीन) तसेच प्रोसेस लाईन, सेटअप मशीन सिलेक्शन, कच्चामाल, बाजारपेठ, निर्यात क्षेत्रात उद्योग संधी, मालाची प्रत इत्यादी. तसेच प्रात्यक्षिक मध्ये-मेथी पावडर, पालक पावडर, हिरवी मिरची पावडर, आले लसूण पावडर, कढीपत्ता,पुदिना पावडर, बनाना पावडर, चिकू फ्लेक्स, पायनॅपल फ्लेक्स. रेडी टू कुक मध्ये – मिसळ, उसळ, राजमा छोले या सर्व विषयांवर विषयांवर तज्ज्ञ व्याख्यात्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या संधीचा लाभ युवक, युवती व महिलांनी घ्यावा तसेच उद्योग करण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे, जिल्हा प्रकल्प समन्वयक सौ.प्रतिभा निमकर यांनी केले आहे. प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी सौ.शुभांगी झाडे मोबाईल क्रमांक ७३८७७३४२६६, सौ.उषा वानखेडे मोबाईल क्रमांक ८४८४०२११६२ यांच्याशी व प्रत्यक्ष भेटीसाठी मुख्यालय महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एम सी इ डी अ ३८ एमआयडीसी एरिया, रेल्वे स्टेशन रोड येथे संपर्क साधावा.०००००

संबंधित पोस्ट

पेन्शन अदालत’मधून निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा-अनेक प्रलंबित प्रश्नांची जागेवरच सोडवणूक

विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून  समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल – मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे- विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न…

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट,आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने एन.डी.आर.एफ आणि एस.डी.आर.एफ यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक

vishwatmaklokswamivarta

प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीन.. तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील- मंत्री संजय राठोड

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ