vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे-फिश मार्केटच्या वास्तूचे भूमिपूजन संपन्न

महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे-फिश मार्केटच्या वास्तूचे भूमिपूजन संपन्न

 

       राज्य प्रतिनिधी सांगली, महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी येथे केले.

  सांगली येथील खणभाग येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत फिश मार्केटच्या भूमिपूजनांतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, पुणे विभाग मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ, महानगरपालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, सम्राट महाडिक, स्वाती शिंदे, सुनंदा राऊत यांच्यासह महानगरपालिकचे आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.

     मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, हा अतिशय चांगला प्रकल्प आहे. विकासाची प्रक्रिया अशीच चालू ठेवावी. अधिकच्या चांगल्या सोयीसाठी या वास्तूमध्ये आणखी एक मजला वाढविण्यासाठी व कोल्ड स्टोरेजबाबत मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा. लवकरात लवकर तो मंजूर करू. शासन म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सदैव कटिबध्द आहे. फिश मार्केट तयार झाल्यानंतर मत्स्य व्यावसायिकांनी रस्त्यावर विक्री न करता फिश मार्केटमध्येच करावी, असे ते म्हणाले.

  यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली शहरात एक चांगली वास्तू उभारत आहे. यासाठी आवश्यकता भासल्यास खासदार फंडातूनही मदत करू. हा चांगला प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.

महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, फिश मार्केट पूर्ण होईपर्यत येथील व्यावसायिकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरात लवकर ही वास्तू उभारण्यासाठी प्रयत्न करू. या वास्तूमध्ये आणखी एक मजला व कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करू. या माध्यमातून मत्स्य व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची चांगली संधी उपलब्ध होईल असे ते म्हणाले.   स्वाती शिंदे यांनी ही वास्तू उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर सांगली शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या.

   प्रास्ताविकात अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या फिश मार्केटच्या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम 8 कोटी 7 लाख 53 हजार इतकी आहे. कामाचे क्षेत्रफळ 1520 चौरस मीटर असून यामध्ये 3 x 3 मीटरचे 81 दुकान गाळे, मासळी बाजारमध्ये वेस्ट डिस्पोजल युनिट, 14.73 मीटर x 3 मीटरची स्टोअर रूम, पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, ग्रॅनाईट फ्लोरिंग, प्रत्येक दुकानासाठी मासे स्वच्छतेसाठी स्वतंत्र नळ कनेक्शन व प्लॅटफॉर्म, ड्रेनज व्यवस्था, 3 मीटर रूंदीचे अंतर्गत पॅसेज, 100 दुचाकी व 30 चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था अशा सोयी सुविधा असणार आहेत, असे सांगितले.      या कार्यक्रमास नागरिक, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.00000

संबंधित पोस्ट

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन 

नागपूर मेट्रो टप्पा-२ विस्तारास व सागरी सेतू-वांद्रे किल्ला कनेक्टरला मान्यता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठक

कारगिल विजय दिवसाच्या 26 व्या स्मरण दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि संजय सेठ यांच्या उपस्थितीत ‘कारगिल विजय दिवस पदयात्रेचे आयोजन

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी

निवडणूक आयोगाकडून बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ..

पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त,मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार, मदत व बचाव कार्याचा दावोस येथून समन्वय..

vishwatmaklokswamivarta