vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेठळक बातम्यास्थानिक बातम्या

५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चार आरोपींना अटक..

५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चार आरोपींना अटक..

 

मुंबई (प्रतिनिधी)-

भायखळा पोलिसांनी बनावट ५०० रुपयांच्या नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून चार आरोपींना अटक केली आहे. उमरान उर्फ आसिफ उमर बलबले (वय ४८, रा.मुंब्रा),यासिन युनूस शेख (वय ४२, रा. भायखळा)भीम प्रसादसिंग बडेला (वय ४५,रा. भायखळा)व निरज वेखंडे (वय २५, रा.निहालपाडा, वाडा, पालघर)अशी या चौघांची नावे आहेत.

या आरोपींनी बनावट नोटा तयार करून त्या चलनात वितरित करण्याचा मोठा कट रचला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य जप्त केले असून, या टोळीचा मुख्य मास्टरमाइंड सध्या पोलिसांच्या रडारवर आहे.

भायखळा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की ,प्रसाद पान बिडी जनरल स्टोअरजवळ तीन इसम बनावट ५०० रुपयांच्या नोटा विक्रीसाठी येणार आहेत. पोलिसांनी त्वरित दोन पथक तयार करून या ठिकाणी सापळा रचला. तीन संशयित व्यक्ती घटनास्थळी आल्यावर त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर ५०० रुपयांच्या एकूण २०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

अटक आरोपींपैकी उमरान उर्फ आसिफ बलबले याने तपासादरम्यान वाडा, जिल्हा पालघर येथील एका ठिकाणी बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची माहिती दिली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून निरज वेखंडे या आरोपीला अटक केली आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.

VICTUS आणि HP कंपनीचे लॅपटॉप, चार्जर, आणि माऊस, लॅमिनेशन मशीन, १३६७ नग A4 बटर पेपर (प्रत्येकावर ५०० रुपयांची प्रिंट),UV लाइट मशीन, नोटा डिटेक्टर

कलर प्रिंटर (Cannon मॉडेल G-670), Colour Laser 150NW Printer (Serial No. CBN2R6NPQX),२० लोखंडी कटर, ५० बटर पेपर रोल, १५ फुट लांब धागा आदी साहित्य जप्त केले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेश शिंगोटे,नवनाथ घुगे, सपोनि सुहास माने, पोउपनि सचिन पाटील, पोह हर्षल देशमुख, व गुन्हे प्रकटीकरण पथकाने पार पाडली.

पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कोणत्याही संशयास्पद नोटा आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

जव्हार अर्बन बँकेच्या नोकर भरतीसाठी सुधारित प्रस्ताव सादर करा – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रात्यक्षिक संपन्न…

जनाई-शिरसाई सिंचन योजना; बंदिस्त नलिका प्रणालीनिविदा प्रक्रिया एक महिन्यात करणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त**केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ*1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान केवडिया गुजरात येथे होणाऱ्या भारत पर्व महोत्सवातमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग…

vishwatmaklokswamivarta

नागपुरातील छोट्या मैदानांच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जलसंधारण कामावरील बांबू बेटाची केली पाहणी*