vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख‌ रुपये खर्चाचा आराखडा तयार १ हजार १६ गावे, वाड्यांचा आराखड्यात समावेश 

संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख‌ रुपये खर्चाचा आराखडा तयार १ हजार १६ गावे, वाड्यांचा आराखड्यात समावेश

 

राज्य प्रतिनिधी -रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख ६८ हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करुन मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. या आराखड्यात १ हजार १६ गावे व वड्यांवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील काही गावांना एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभमीवर प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून, जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात विहिरी खोल करणे त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीर दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १ हजार १६ गावे, वाड्यांवर संभाव्य पाणी टंचाईच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा दृष्टिक्षेप

उपाययोजना : गावे : वड्या : अपेक्षित खर्च

विहिरी खोल करणे गाळ काढणे : २४ : ४९ : ६० लाख १८ हजारटँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा : १८६ : ५४० : ३ कोटी ५२ लाख ९२ हजार

नविन विंधन विहिरी : २७ : ८० : १ कोटी ३ लाख ६८ हजार विंधन विहिरींची दुरुस्ती : ३९ : ७१ : ४५ लाख ९० हजारजिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्रोतां व्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठे पाणी पुरवठा पाइपलाइन फुटली असल्यास निदर्शनास आणून द्यावी.: डॉ. भरत बास्टेवाड,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे-शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

एल्डर लाईन – १४५६७; ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन

कोकण किनारपट्टीला ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

वन जमिनींच्या वाटपाबाबतची याद्या प्रसिद्ध, हरकतींसाठी १० दिवसांची मुदत…

दख्खन जत्रेतून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दख्खन जत्रा 2025 चे उद्‌घाटन- 21 मार्चपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनाभारतरत्न मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे