vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षा-केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश

जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षा-केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश

 

        सांगली, प्रतिनिधी

: सांगली जिल्ह्यात दि. 18 जानेवारी 2025 रोजी जवाहर नवोदय विद्यालय पलूस यांची पात्रता परीक्षा एकूण 25 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परीक्षा वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परीक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस, डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे.

ही परीक्षा सांगली हायस्कूल सांगली, जी. आर. पुरोहित कन्या शाळा सांगली, डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज मिरज, स्व. रा. भारती विद्यामंदिर तासगाव, चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर तासगाव, व्ही. एस. पागे कृषि माध्यमिक तासगाव, विटा हायस्कूल विटा, के. के. गुळवणी विद्यालय विटा, श्री भवानी विद्यालय आटपाडी, श्रीम. वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूल आटपाडी, जत हायस्कूल जत, के. एम. हायस्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज जत, सिध्दार्थ पब्लिक स्कूल जत, एस.आर.व्ही.एम जत, श्री. महांकाळ हायस्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज कवठेमहांकाळ, श्री. बाळासाहेब गुरव हायस्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज कवठेमहांकाळ, आदर्श बालक मंदिर इस्लामपूर, विद्यामंदिर हायस्कूल इस्लामपूर, यशवंत हायस्कूल इस्लामपूर, न्यू इंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज शिराळा, श्री छत्रपती माध्यमिक विद्यालय शिराळा, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यालय पलूस, पंडीत विष्णू डी.पी.एम.व्ही. पलूस, महात्मा गांधी विद्यालय कडेगाव, भारती विद्यापीठ एम.पी. गर्ल्स हायस्कूल कडेगाव.  हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.00000

संबंधित पोस्ट

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण.

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद-७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान वाशिम–बुलढाणा जिल्ह्यात ब्लॉक

vishwatmaklokswamivarta

गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप- जिल्ह्यात 657 उमेदवारांची नियुक्ती

निराधार मुलांच्या आधार नोंदणीसाठी ‘साथी’चा आधार,एकही निराधार बालक आधार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे