vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…

 

राज्य प्रतिनिधी-एसटी महामंडळाच्या 1360 हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रेडाई (CREDAI) या संस्थेने आपले योगदान द्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज’ने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. त्याप्रसंगी मंत्री बोलत होते.

सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्यभरात 842 ठिकाणी 1360 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या जागांचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासकाकडून बांधून घेण्यात यावीत. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 100 खाटांचे अद्ययावत रुग्णालय, इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनलसारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. या बदल्यात संबंधित विकासकाला त्या जमिनीवर त्याच्या सोयीनुसार व्यावसायिक क्षेत्र विकसित करता येईल.

यासंदर्भातील सर्वसमावेशक धोरण लवकरच एसटी महामंडळ आणणार असून यासाठी सूचना आणि प्रस्ताव क्रेडाई यासारख्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत संस्थेने द्यावेत, असे आवाहनही क्रेडाई मंत्री श्री. सरनाईक यांनी केले. याप्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल व इतर पदाधिकारी, विकासक, वास्तुविशारद उपस्थित होते. एसटी महामंडळातर्फे वास्तुविशारद निलेश लहिवाल यांनी महामंडळाचे सादरीकरण केले

संबंधित पोस्ट

शेती उत्पादन वाढ, शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- कृषि विभागाच्या शेतकरी परिसंवादात प्रतिपादन- शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे आवाहन

श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते;मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

बीडमधील हत्येप्रकरणी बातमी; दोन मुख्य आरोपींना अटक, संतोष देशमुखांचं लोकेशन देणाराही ताब्यात..

निर्यातवाढीसाठी तालुकास्तरीय मेळावे घ्यावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा निर्यात प्रचालन समितीची बैठक संपन्न- ज्येष्ठ कृषि तज्ज्ञ नानासाहेब पाटील यांनीही केले मोलाचे मार्गदर्शन- निर्यात वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा

जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम #‘ई-टपालवाला सेवा’जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांना आता मिळणार जलद माहिती..

अमली पदार्थाविरोधात व्यापक कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta