vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.25 जानेवारी 2025 रोजी15 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.25 जानेवारी 2025 रोजी15 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

 

ठाणे, प्रतिनिधी:- दि.25 जानेवारी 2025 रोजी 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस राज्यस्तर, जिल्हास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करावयाचा आहे. या 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Nothing like voting. I Vote for sure” हा विषय (Theme) आयोगाकडून देण्यात आला आहे.

मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार दि.25 जानेवारी 2025 हा कामकाजाचा दिवस नसल्याने दि.24 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये मतदान शपथ घेण्यात यावी (मराठी, इंग्रजी व हिंदी मधील शपथेचा नमुना सोबत जोडला आहे), असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम दि.25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे हे असतील तर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वाटप व उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे.

तरी या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमास दि.25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत –जिल्हाधिकारी किशन जावळे

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची जालना महानगरातील योगेश नगर व महादेव मंदिर परिसराला भेट

पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांसाठी खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची सूचना गृह राज्यमंत्री योगेश कदम

vishwatmaklokswamivarta

बँकांनी विविध महामंडळांची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत..

vishwatmaklokswamivarta

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा-राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे तर अध्यक्षपदी माधव बावगे यांची एकमताने निवड५ प्रधान सचिवांसह ७ सरचिटणीस करणार राज्याचे नेतृत्व..