vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीचा ‘विभागीय आयुक्ता’कडून आढावा…

प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीचा ‘विभागीय आयुक्ता’कडून आढावा…

छत्रपती संभाजीनगर , प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा 26 जानेवारी रोजी सकाळी 9:15 वाजता देवगिरी मैदान, पोलीस आयुक्त कार्यालय येथे आयोजिण्यात आला आहे. मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज येथे दिले.

प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अरविंद लोखंडे, तहसीलदार अरूण पावडे, नायब तहसीलदार गजानन नांदगावकर यांच्यासह महसूल, पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, माहिती व जनसंपर्क आदीसह विविध कार्यालयांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. गावडे म्हणाले की, मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळी स्वच्छता, कार्यक्रम स्थळी असलेली व्यवस्था, ध्वजाला मानवंदना, पोलीस पथक, बँड पथकाची नियुक्तींसह याबाबतच्या तयारीची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत अशा सूचनाही श्री. गावडे यांनी बैठकीत दिल्या.

उपायुक्त लोखंडे यांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत शासनाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत माहिती दिलीयावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ कथासंग्रहाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे दोन महत्त्वाचे निर्णय,सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी मदत, नापीक जमिनी मनरेगातून लागवडीयोग्य करता येणार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे तातडीने अंमलबजावणीचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

स्वायत्त महाविद्यालयांसाठी राज्यस्तरावर एकसमान मार्गदर्शक सूचना तयार करा – मंत्री चंद्रकांतदादा पाटील १५ ऑगस्टपूर्वी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत जालन्यातील 800 लाभार्थी आयोध्यासाठी रवाना**भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखवली हिरवी झेंडी*

अमरावती येथील परतवाडा येथे वायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन