vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना आधार अद्यावतीकरणाचे आवाहन

विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना आधार अद्यावतीकरणाचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– संजय गांधी निराधार योजना शहर विभाग अंतर्गत विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्याचे अनुदान त्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी आधार कार्डाचे अद्यावतीकरण करणे आवश्यक असून लाभार्थ्यांनी ते त्वरीत करावे,असे आवाहन प्रभारी तहसिलदार उत्तम बहुरे यांनी केले आहे.

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा विशेष सहाय्य योजनांचे डिसेंबर २०२४ पासून पुढील महिन्यांचे अनुदान थेट डीबीटीद्वारे जमा होणार आहे. त्यासाठी आधार कार्ड हे डीबीटी प्रणालीत अद्यावत करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत एकूण १४ हजार ९०५ लाभार्थ्यांपैकी १४ हजार ४९७ लाभार्थ्यांनी आपली माहिती नोंदविली आहे. या नोंदवलेल्या १४ हजार ४९७ लाभार्थ्यांपैकी १० हजार २०४ लाभार्थ्यांचे आधार अद्यावतीकरण झाले आहे. उर्वरित ४२९३ लाभार्थ्यांनी आपले आधार अद्यावतीकरण केले नसल्याने त्यांना अनुदान प्रदान करणे शक्य होणार नाही. ज्या लाभार्थ्यांचे आधार अद्यावतीकरण बाकी आहे त्यांनी ते त्वरीत करुन घ्यावे. त्यासाठी आपले आधार कार्ड व संलग्नित मोबाईल व्यक्तिशः घेऊन यावे,असे आवाहन प्रभारी तहसिलदार उत्तम बहुरे यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

७ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये संविधान जनजागरण परिषदेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत…

पाटण आगाराच्या १३ नवीन एसटी बसचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण

आताची बातमी – बीड जिल्हा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अत्याधुनिक दोन ‘मॅग्लुमी’ मशीनचे लोकार्पण विविध रक्त चाचण्या होणार अधिक वेगाने; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा..

नागरिकांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल