vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन**महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण*

*भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन**महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण*

 

रायगड,1 प्रतिनिधी- भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रविवार, दि.२६ जानेवारी २०२५ रोजी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी ९.१५ वा.संपन्न होणार आहे.

ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रीय/समारंभीय पोषाख परिधान करण्यात यावा. ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८-३० ते १० वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहणाचा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८-३० पूर्वी किंवा सकाळी १० वाजेनंतर करावा.

ध्वजसंहितेतील सर्व नियमांचे व सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतूदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. ख़राब झालेले माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधुन शिऊन बंद करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी हे राष्ट्रध्वज तहसिल कार्यालयात सुपूर्द करावेत. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखावा. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभासाठी प्रवेश अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत करण्याची मुदत..

दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना राखी बांधली

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘फूट प्रिंट ऑफ डिग्निटी’ पुस्तकाचे प्रकाशन

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी केली विविध विकास कामांची पाहणी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महास्ट्राइड’ मूल्यांकन समितीची बैठक

कमी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये आणि शेत मजुरांना 25 हजार रुपये देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

vishwatmaklokswamivarta

सातारा शहरात माय भारत सरदार वल्लभभाई पटेल यूनिटी मार्चद्वारे दुमदुमला राष्ट्रीय एकतेचा जयघोष**देश एकसंध ठेवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta