vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सध्याच्या सोडत पध्दतीबाबत-शेतकऱ्यांचे अभिप्राय नोंदविण्याबाबत कृषी विभागानी केले आवाहन

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सध्याच्या सोडत पध्दतीबाबत-शेतकऱ्यांचे अभिप्राय नोंदविण्याबाबत कृषी विभागानी केले आवाहन

 

ठाणे, प्रतिनिधी- सन 2020 पासून कृषी यांत्रिकीकरण योजना महाडिबीटीवर ऑनलाईन अर्ज करुन सोडत काढून राबविण्यात येते. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविताना शेतकरी बंधूनी अर्ज दाखल केल्यानंतर लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येते. महाडिबीटी प्रणालीवर योजना सुरु होवून 4 वर्षांचा कालावधी झाला आहे. ही प्रचलित ऑनलाईन सोडत पध्दत योग्य आहे किंवा कसे याबाबत शेतकरी बांधवांची मते जाणून घेण्यासाठी कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना महाडिबीटी प्रणाली सोडत पध्दतीबाबत पुढीलप्रमाणे शेतकरी प्रतिक्रिया देण्यात याव्यात:-

1. सध्याची सोडत पध्दत योग्य आहे का? होय / नाही

2. या व्यतिरिक्त सोडत पध्दत “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या पध्दतीची असावी असे वाटते का? होय / नाही

प्रचलित सोडत पध्दत व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यापैकी कोणती सोडत पध्दत प्राधान्याने राबवावी, याबाबतचा अभिप्राय……………….

3. याबाबत आपले काही नवीन अभिप्राय असल्यास.

कृषी यांत्रिकीकरण सोडत पध्दतीबाबत वरीलप्रमाणे आपले म्हणणे/सूचना/मते नजिकच्या कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

स्मृतीचा केवळ सांगलीकरांनाच नव्हे तर देशवासियांनाही अभिमान- पालकमंत्री चंद्रकांत पाटील श्रीनिवास मानधना यांच्या निवासस्थानी भेट देऊन केले विशेष अभिनंदन,बाबा…. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तुमच्या लेकीने इतिहास घडवला! असे गौरवोद्गार

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मदत करणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील ‘मिनी सरस-२०२५ प्रदर्शनास’ भेट

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या17 जणांवर दंडात्मक कारवाई

एमएचटी-सीईटी-परिक्षा केंद्र व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ मधील तरतूदी लागू..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026’च्या समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती.यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.कायदा-सुव्यवस्थेसह क्रीडाक्षेत्रातही पोलीस दल अव्वल!

vishwatmaklokswamivarta

शिर्डी येथे होळीनिमित्त श्री साईबाबा संस्थान तर्फे समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट..