vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विमुक्त जाती/भटक्या जमाती, इतर व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या,शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता शासनाचे शुद्धीपत्रक जारी..

विमुक्त जाती/भटक्या जमाती, इतर व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या,शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता शासनाचे शुद्धीपत्रक जारी..

 

ठाणे, प्रतिनिधी:- राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरु असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून रुपये 6.00 लक्ष वरुन रुपये 8.00 लक्ष करण्यास शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शिवृत्ती-2023/प्र.क्र.135/शिक्षण-1, दि.20 सप्टेंबर 2024 च्या शासन शुद्धीपत्रकाद्वारे मान्यता दिली आहे.

या शासन निर्णयातील उपरोक्त मजकूराऐवजी खालीलप्रमाणे मजकूर वाचावा, असे शासनाकडून कळविण्यात आले आहे.“राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित व शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरु असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरिता उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.”इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे कक्ष अधिकारी डॉ.प्रकाश धावले यांच्या स्वाक्षरीने दि.20 सप्टेंबर 2024 रोजी हे शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२४०९२३१५५४३७४८३४ असा आहे.

00000

संबंधित पोस्ट

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात आज 15 मे पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी  संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यात – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

अमृत आणि एम सी ई डी मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत राहून आरोग्यसेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सात आरोग्य योद्ध्यांचा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार

जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*