vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मराठी भाषा पंधरवडानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन, ‘विक्री’ आणि ‘ग्रंथदान’ उपक्रम; ग्रंथदान करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

मराठी भाषा पंधरवडानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन, ‘विक्री’ आणि ‘ग्रंथदान’ उपक्रम; ग्रंथदान करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी : मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यभरात मराठी भाषा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘पुस्तक प्रदर्शन व विक्री’चे आयोजन करण्यात आले होते. यासह ‘ग्रंथदान’ हा उपक्रम देखील राबविण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रदर्शनीला भेट देऊन ग्रंथदान करण्याचे आवाहन केले.

हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन भूसंपादन इमारतीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला पुस्तकप्रेमी, वाचनप्रेमीं यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच ‘ग्रंथदान’ उपक्रमातमध्ये अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभागी घेऊन 100 हून अधिक पुस्तक दान केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिलहाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड उपस्थित होते. 000000

संबंधित पोस्ट

जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

पत्रकार चौक ते डीएसपी चौक येथे एलईडी पथदिव्यांचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

महिलांचा देशाच्या प्रगतीत व नवीन पिढी घडवण्यात, त्यांच्यापुढे आदर्शठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा : डॉ. देवेश पाथ्रीकर

जेव्हा मुख्यमंत्री एका लहान विद्यार्थिनीचे ‘इंटरव्ह्यूअर’ बनतात…* 

राज्यात सन 2026-27 साठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक‘राह-वीर’ रस्ते अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्यायोजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी