vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,गृहराज्यमंत्र्यांचा पोलीस कुटुंबीयांशी संवाद

पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,गृहराज्यमंत्र्यांचा पोलीस कुटुंबीयांशी संवाद

 

अमरावती, प्रतिनिधी : पोलीस कुटुंबीयांशी संवाद कार्यक्रमात मांडण्यात आलेल्या समस्या लेखी स्वरुपात घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन गृह ग्रामीण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
पोलीस मुख्यालयात आज डॉ. भोयर यांनी पोलीस कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बारवरकर आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी, पोलीस कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा संवाद कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी त्यांचे कुटुंबीय यांना होत असलेल्या समस्यांबाबत माहिती घेण्यात येत आहे. संवादामधून अनेक नवीन मुद्दे समोर येत आहेत. प्रामुख्याने पोलिसांच्या निवासस्थानाची समस्या समोर येत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शासनाच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात निवासस्थानी बांधण्यात येत आहेत. याबाबत राज्यस्तरावर समिती सहकार्य करीत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलीस ठाणे आणि निवास व्यवस्था आहे. या ठिकाणी आवश्यक ती तरतूद करून समस्या मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
पोलीस कुटुंबीय कायम दुसऱ्याच्या संरक्षणासाठी तयार असतात. मात्र पोलीस कर्तव्यावर असताना त्यांचे कुटुंब सुरक्षित राहील, यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. आज संवादामध्ये मांडलेल्या विविध मुद्द्यांवर दखल घेण्यात येईल. या सर्व समस्या पोलीस प्रशासनाकडून लेखी स्वरुपात मागविण्यात येऊन त्या लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नवीन बांधकामे हाती घेण्यात आली आहे. तसेच पोलीस कुटुंबीयांशी सातत्याने संवाद साधण्यात येत असल्यामुळे अनेक समस्या निकाली निघत असल्याचे सांगितले. श्रीमती बारवरकर यांनी प्रास्ताविक केले. विशाल आनंद यांनी आभार मानले.

संबंधित पोस्ट

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे – एकनाथ शिंदे*राजधानीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भावपूर्ण समारोप.*दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येणार – अजित पवार**# संस्कृतीची वाहक असलेल्या भाषेची निगा राखणे सर्वांचे कर्तव्य – डॉ. भवाळकर*

vishwatmaklokswamivarta

आता नवी मुंबईतील महिला योग्य प्रशिक्षण घेऊन चालविणार एनएमएमटी बस – महापौर श्रीम. सुजाता पाटील

vishwatmaklokswamivarta

जंतरमंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं, आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले.

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी…

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सेवासंकल्पाला चंद्रपूरचा सलाम; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ‘आशीर्वादाचा दिवा’!जिथे अंधार आहे, तिथे पुढील ३६५ दिवसांत पंतप्रधान मोदीजींच्या योजनांचा प्रकाश पोहोचवू”; आ. सुधीर मुनगंटीवार यांचे सेवा-संकल्पाचे आवाहन३५ चिमुकल्या लेकींच्या शुभहस्ते ७६ फुटांचा केक कापून मोदीजींचा जन्मदिन थाटात साजरा..

vishwatmaklokswamivarta

अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास निधी-उपलब्ध करुन देऊ- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta