vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्या

काँग्रेस माजी अध्यक्ष सोनिया गांधीं यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर केली ‘Poor Lady’ विवादित टिपण्णी; बिहारमध्ये खटला दाखल

काँग्रेस माजी अध्यक्ष सोनिया गांधीं यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर केली ‘Poor Lady’ विवादित टिपण्णी; बिहारमध्ये खटला दाखल

 

राज्य प्रतिनिधी-: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी  यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांना ‘Poor Lady’ असे संबोधल्याबद्दल बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सीजीएम कोर्टात सुधीर ओझा नावाच्या वकिलाने ही तक्रार दाखल केली.

या प्रकरणाची सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. याचिकाकर्त्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वढेरा यांचेही सह-आरोपी म्हणून नाव दिले आहे. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे

याचिकाकर्ते सुधीर ओझा यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर केलेले भाष्य अत्यंत आक्षेपार्ह होते. राष्ट्रपती एक महिला आहेत आणि आदिवासी समुदायातून येतात, त्यांच्याविरुद्धची ही टिप्पणी आक्षेपार्ह आहे

संबंधित पोस्ट

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन..

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आज आपल्या एअरसाइड कामकाजाची सुरुवात पहिल्या व्यावसायिक विमानाचे आगमन,पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूट देऊन सन्मानित

vishwatmaklokswamivarta

राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’ केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आयोजन; ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ ही संकल्पना

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार-मुख्यमंत्री फडणवीस· आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,