vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्यू पावलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील,जवानाच्या वारसांना साडेसात लाख नुकसान भरपाई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे यासंदर्भात कायमस्वरुपी धोरण तयार करण्याचे निर्देश

अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्यू पावलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील,जवानाच्या वारसांना साडेसात लाख नुकसान भरपाई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे यासंदर्भात कायमस्वरुपी धोरण तयार करण्याचे निर्देश

राज्य प्रतिनिधी:- अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान तथा वाहन चालक कैलास गेणू कसबे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.तसेच भविष्यात अशा प्रकरणांमध्ये सत्वर मदत होण्याच्या दृष्टीने गृह विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरुपी धोरण तात्काळ करण्याचे निदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती, उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी दिली.

  नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्र.१ मधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यावर ७ जुलै २०२४ रोजी रात्री कारवाई केली होती. अवैध मद्यविक्री करणाऱ्या आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करीत असताना राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या भरारी पथकाच्या वाहनाला आरोपींच्या वाहनाने धडक दिली व त्यामध्ये जवान तथा वाहनचालक कैलास गेणू कसबे यांचा मृत्यू झाला होता.  उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री.पवार यांनी या खात्याचा कार्यभार घेताच या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सन २०१४ मध्ये गृह विभागाने केलेल्या मदतीच्या धर्तीवर (पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय ठरल्याप्रमाणे साडेसात लाख रुपये) राज्य उत्पादन शुल्क विभागातील दिवंगत जवान कैलास कसबे यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून रु.७.५० लाख नुकसान भरपाई मंजूर केली आहे.0000

संबंधित पोस्ट

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम मृद व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय निर्गमित

सेल्को फाउंडेशन’च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत,प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरणसौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास,वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे**डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खडवली येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाला भेट देत शासकीय निरीक्षण गृहाची केली पाहणी**संस्थेतील संशयास्पद नोंदींची चौकशी करा; बालिका आश्रमांवर देखरेख वाढवण्याचे निर्देश*

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला शोक

वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली,