vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गतीने करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात अहिल्यानगर पाणीपुरवठा अंतर्गत जल जीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार सदानंद दाते, प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अहिल्यानगरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता राम लोलपोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी सुरू असलेल्या योजना गतीने पूर्ण कराव्यात. समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात. पाणीपुरवठा योजनेतील कामांची तपासणी करण्यात यावी. जे ठेकेदार किंवा अधिकारी कामामध्ये विलंब करतात, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.

पाणीपुरवठा योजना ही ग्रामीण भागांतील नागरिकांसाठी जीवनावश्यक आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठोस रोडमॅप तयार करणे, पाणीपुरवठ्याची गुणवत्ता आणि प्रमाण तपासणे आणि कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.०००

संबंधित पोस्ट

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन.

म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून आढावा..

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे : राज्यपाल आचार्य देवव्रत

vishwatmaklokswamivarta

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट दरात वाढ

संघगीतांमध्ये प्रेरणेच्या भावनेसह भविष्याला दिशा देण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शंकर महादेवन यांनी गायलेल्या संघगीतांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta