vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाने शिवसेनाप्रमुखांचा विश्वासू सहकारी गमावला  — उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाने शिवसेनाप्रमुखांचा विश्वासू सहकारी गमावला  — उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

 

मुंबई, प्रतिनिधी- “मुंबईतील गिरणगावात वाढलेले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासाचा परिसस्पर्श लाभलेले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत महाराष्ट्राच्या गेल्या पाऊण शतकाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी ही त्यांची ओळख होती. शिवसेनेचे मुखपत्र ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादकपद प्रदीर्घकाळ भूषवताना मराठी माणसाचे हक्क, मराठी अस्मितेचे रक्षण, महाराष्ट्राच्या हितरक्षणाला त्यांनी प्राधान्य दिले. लालबाग, परळ भागातल्या वास्तव्यामुळे मुंबईतील कामगार चळवळीबद्दल त्यांना विशेष आस्था होती. शिवसेनेचा आणि कामगार चळवळीचा उत्कर्षाचा काळ त्यांनी जवळून अनुभवला होता. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी सर्वस्पर्शी विपूल लेखन केले. त्यांनी केलेले वार्तांकन, लिहिलेले लेख, पुस्तके ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा, समृद्ध जडणघडणीचा मोलाचा दस्तावेज आहेत. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. दिवंगत बाळासाहेबांचा विश्वासू शिलेदार आपण आज गमावला आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील 500 अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन…

राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरहून संसद भवनावर मार्च, संसद भवन परिसरात  सुरक्षित वाढ…

vishwatmaklokswamivarta

✨🎬 गणेशोत्सव 2025 निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची रील स्पर्धा 🎬✨

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली

vishwatmaklokswamivarta

आज तब्बल ५ हजार ३५४ घरे व ७७ भूखंडाच्या संगणकीय सोडतीद्वारे घराचे स्वप्न झाले साकार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत–२०२५ संपन्न

vishwatmaklokswamivarta