vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राज्य आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि.१४) जनसुनावणी

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राज्य आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि.१४) जनसुनावणी

 

राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. त्यानुषंगाने महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिकस्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरिता ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार दि.१४ रोजी सकाळी साडेदहा वा. जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनसुनावणी घेण्यात येणार आहे. या जनसुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. त्यांचे समवेत सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे या उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील कोणतीही तक्रारदार पिडीत महिला कोणतीही पुर्वसुचना न देता सदर स्थानिक पातळीवर थेट जनसुनावणीस उपस्थित राहुन आपली लेखी समस्या / तक्रार आयोगापुढे मांडु शकेल. या जनसुनावणीस पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक असे विविध प्रशासकीय प्रमुख उपस्थित असल्याने तात्काळ कार्यवाही करणे शक्य होते. तरी या जनसुनावणीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त तक्रारदार पिडीत महिलांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

सोमवारी डाक अदालतीचे आयोजन

पुढील आठवड्यात महाकर्जमुक्ती लाभ वाटपाला होणार प्रारंभ,५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमुक्तीपलीकडे शाश्वत शेतीचा शासनाचा व्यापक आराखडा..

अग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी कृषीमंत्र्यांनी साधला संवाद शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

नायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक, १४२ कोटींची तरतूद…

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारकडून एकीकृत निवृत्ती वेतन योजना (यूपीएस) पेन्शन योजनेची अधिसूचना जारी

vishwatmaklokswamivarta